शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण कार्ड

By admin | Updated: March 2, 2015 02:09 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास हा केवळ मुलांना वर्गाबाहेर काढून पूर्ण केल्या जात होता. मुलांमध्ये क्रीडा नैपुण्य यावे यासाठी ...

यवतमाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास हा केवळ मुलांना वर्गाबाहेर काढून पूर्ण केल्या जात होता. मुलांमध्ये क्रीडा नैपुण्य यावे यासाठी प्रत्येक मुलाला शारीरिक शिक्षण कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २०० शिक्षकांना प्रशिक्षित केले जात आहे. याची जबाबदारी सहा मास्टर ट्रेनरवर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी प्राथमिक शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचे आठवड्यातून पाच तास घेतले जात होते. मात्र शारीरिक शिक्षणाचा तास म्हणजे शिक्षकांची विश्रांती असाच होत होता. मुलांना वर्गाबाहेर सोडून त्यांना वाटेल तसे खेळू दिले जायचे. त्यांच्या प्रशिक्षण अथवा क्रीडा अभिरुची निर्माण होण्यासाठी विशेष असे कोणतेच प्रयत्न होत नव्हते. शारीरिक शिक्षकाचे काम केवळ कागदोपत्री चालत होते. या संपूर्ण गोष्टी थांबविण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी युनिसेफच्या निर्देशानुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये चपळता, संतुलन, समन्वय या तीन गुणांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी शारीरिक शिक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार खेळ, शारीरिक शिक्षणासाठी १०० शाळांची निवड करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र हा सुत्य उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला आहे. तशा सूचना त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी सूचिता पाटेकर यांना दिल्या आहेत. सहा शिक्षकांनी मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय अध्यापक महाविद्यालयात २०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यानंतर तालुका पातळीवर शारीरिक शिक्षकांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. शाळांमध्ये क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा अभिरूची वाढविण्यासाठी शासनस्तरावरूच नव्याने प्रयत्न केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)