यवतमाळ : दिवाळी अग्रीम व वेतन मंजूर न केल्याने संतप्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याची घटना येथील जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात घडली. या प्रकरणी सोमवारी शहर पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदविला. शेख वसीम शेख अहमद रा. पांढरकवडा रोड यवतमाळ असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो वाघापूर मार्गावरील कुक्कुटपालन प्रकल्पात कार्यरत आहे. सप्टेंबर महिन्यात सतत गैरहजर असल्याने त्याचे वेतन आणि दिवाळी अग्रीम मंजूर केला नाही. यामुळे त्याने चिडून जाऊन पशुसंवर्धन कार्यालयात येऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतले. मात्र कर्मचाऱ्यांनी हा प्रकार हाणून पाडला. या प्रकरणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप सोनकुसळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख वसीम याच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
कर्मचाऱ्याने अंगावर घेतले पेट्रोल
By admin | Updated: November 11, 2015 01:38 IST