शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

जनता कर्फ्यू हा कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी हत्यार जिल्हावासीयांनी पहिल्याच दिवशी अतिशय प्रभावीपणे राबविले. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत रविवार २२ मार्चला कुणीही घराबाहेर पडले नाही. काहींना अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडावे लागले. मात्र त्यांनीही काही मिनिटात काम आटोपून घर गाठले. यवतमाळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील सोळाही तालुके व गावागावात हे चित्र पहावयास मिळाले.

ठळक मुद्देपहाटे ५ वाजतापासून १४४ कलम : नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले, सायंकाळी ५ वाजता थाळीनाद करून कृतज्ञता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जनता कर्फ्यू हा कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी हत्यार जिल्हावासीयांनी पहिल्याच दिवशी अतिशय प्रभावीपणे राबविले. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत रविवार २२ मार्चला कुणीही घराबाहेर पडले नाही. काहींना अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडावे लागले. मात्र त्यांनीही काही मिनिटात काम आटोपून घर गाठले. यवतमाळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील सोळाही तालुके व गावागावात हे चित्र पहावयास मिळाले.जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीची साधनेही पूर्णत: बंद होती. एसटी महामंडळाने ४२५ गाड्यांच्या एक हजार फेऱ्या रद्द केल्या. खासगी प्रवासी वाहने, आॅटोरिक्षाही रस्त्यावर दिसलाच नाही. यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस, आर्णी, महागाव, दारव्हा, नेर, बाभूळगाव, कळंब, घाटंजी, मारेगाव, झरी, पांढरकवडा, राळेगाव तालुक्यात जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजीमंडी व्यवस्थापनाने रविवारी बंदची घोषणा केल्यामुळे भाजीपाला, दूध या सारख्या वस्तूही बाजारपेठेत आणल्या नाही. प्रमुख मंदिरे, चर्च, प्रार्थना स्थळेसुद्धा पूर्णत: बंद होती. शनिवारी मध्यरात्रीच लॉक डाऊनची घोषणा झाल्यानंतर नागरिक घरी गेले. ते बाहेर निघालेच नाही. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलीस नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकावरून करीत होते. सायंकाळी ५ वाजता सायरन वाजताच शहरासह गावखेड्यातील नागरिकांनी घरासमोर उभे राहून थाळीनाद, टाळ्या वाजवून प्रशासनाच्या उपाययोजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. घरासमोर आलेले नागरिक काही मिनिटातच परत माघारी फिरले. अनेकांचे दारही पूर्णवेळ बंद होते. रात्री ९ नंतर पुन्हा पोलिसांची गस्त सुरू झाली. कुणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन केले जात होते. यावेळीसुद्धा नागरिक घरातच होते. सर्वत्र चिटपाखरुही दिसत नव्हते. रस्त्यांवर निरवशांतता पसरली होती.

जीवनावश्यक वस्तू विक्री सुरूजनता कर्फ्यूमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त जीवनावश्यक वस्तूंची विक्रीही बंद ठेवली होती. किराणा, दुध, भाजीपाला मिळत नव्हता. मात्र सोमवारपासून सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले. रविवारी रात्री दुधाची दुकाने उघडली होती. कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, १४४ कलम लागू झाल्याने विनाकारण गर्दी करणारे, भटकणारे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे तसे निर्देश प्रशासनाने दिले आहे.

यवतमाळचा एक युवक मुंबईत कोरोना पॉझिटीव्हआफ्रिकेतून भारतात परतलेला यवतमाळातील युवक मुंबई विमानतळावर चाचणीमध्ये कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्याला तेथेच ठेवण्यात आले आहे. जिल्ह््यात १५० संशयितांना होम क्वॉरेनटाईन केले आहे. शासकीय रुग्णालयात सहा जण निगरानी खाली आहेत. यापैकी एकाचा रिपोर्ट निगेव्हीव आल्याने त्याला सुटी देऊन होम क्वॉरेनटाईन केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात विदेशातून आलेले ११६ संशयित आहे. तर २३ जण थेट संपर्कात आलेले आहेत. मुंबई, पुणे येथून आलेले ११ जण निगराणीत आहे.असेच सहकार्य कराकोरोनाला थांबविण्यासाठी प्रतिबंध हाच उपाय आहे. नागरिकांनी जनता कर्फ्यूच्या माध्यमातून उत्तम सहकार्य केले. पुढील काही दिवस नागरिकांनी संयम ठेऊन गर्दी टाळावी. सकाळी ५ वाजतापासून नागरी भागात कलम १४४ लागू होणार आहे.- एम.डी.सिंहजिल्हाधिकारीस्वत:साठी घरात थांबाकुटुंब, देश व मानवतेसाठी हा महत्वाचा काळ आहे. प्रत्येकाने पुढचे काही दिवस घरात थांबून सहकार्य करावे. कुठल्याच अत्यावश्यक वस्तूंची दुकाने बंद केली जाणार नाही. धावपळ करू नये, काही अडचण असल्यास पोलीस ठाण्यात मदत मागावी. पोलीस मदतीसाठी तत्पर आहे.- एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या