शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

दत्तक ग्राम भारीतील विकास कामे पथदर्शक

By admin | Updated: June 17, 2017 01:13 IST

सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी दत्तक घेतलेल्या भारी गावातील विकासकामे पथदर्शक असल्याचा निर्वाळा ....

सांसद आदर्श ग्राम योजना : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून कामांचा गौरव लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी दत्तक घेतलेल्या भारी गावातील विकासकामे पथदर्शक असल्याचा निर्वाळा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने दिला आहे. या संदर्भात ८ जून रोजी पाठविलेल्या पत्रात बेसलाईन सर्वे, ग्राम विकास आराखडा आणि पंचायत दपर्ण अहवाल पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सांसद आदर्श ग्राम योजना तयार करण्यात आली. यातून प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन तेथे शासनाच्या संपूर्ण योजना राबवून त्या गावाचा परिपूर्ण विकास करणे हे या योजनेचे उद्दीष्ट होते. राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी यवतमाळ तालुक्यातील भारी हे गाव या योजनेंतर्गत दत्तक घेतले. विकासाची दूरदृष्टी असलेल्या विजय दर्डा यांनी या गावाच्या विकासाचा मास्टर प्लान तयार केला. प्रशासनासोबत वारंवार बैठका घेऊन गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला. जिल्हा परिषदस्तरावरून ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनांचा कालबद्ध कार्यक्रम निर्धारित केला. यासाठी स्वत: विजय दर्डा यांनी भारी येथे प्रशासकीय यंत्रणेच्या बैठका घेतल्या. याला खुद्द जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. गावाच्या भौतिक विकासासोबतच सामाजिक स्वास्थ्य संवर्धनासाठी येथे व्यसनमुक्तीवर विशेष कार्यशाळा घेण्यात आली. तज्ज्ञांकडून जनजागृतीपर कार्यक्रमांची मोहीम गावात राबविली. याला बऱ्याच अंशी महिला व ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सांगड घालण्यात आली. विजय दर्डा यांच्या नेतृत्वात तेथील माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांनी विकासाच्या योजना राबविण्यावर भर दिला. यातून प्रामुख्याने गावाचा बेसलाईन सर्वे पूर्ण करण्यात आला. गावाचा विकास आराखडा तयार करण्यात आला. इतकेच नव्हे तर पंचायत दर्पण अहवालही परीपूर्णरित्या तयार केला. याची दखल थेट केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने घेतली. भारी येथे स्मशानभूमी शेड आणि सौंदर्र्यीकरणाचे काम पूर्ण केले. गावात सिमेंट रस्ते बांधले. खासदार निधीतून हायमास्ट लाईट बसविण्यात आले. घर तेथे शौचालय हा उपक्रमही यशस्वीपणे राबविला. तब्बल १७ प्रकारचे विकास प्रकल्प येथे यशस्वीपणे राबविण्यात आल्याचे ग्रामविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यात बालकांचे आरोग्य संवर्धन, लसिकरणाचा कार्यक्रम, मध्यान्ह भोजन योजना, गरोदर मातांसाठी पोषाहार, घरोघरी विद्युत जोडणी याशिवाय माती परीक्षण करून स्वाईल हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना देण्यात आले. यातून शेतीच्या उत्पन्न वाढीवर भर दिला गेला. एकंदर ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या धर्तीवर संपूर्ण उपक्रम येथे राबविण्यात आले. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशूधन संगोपनाला चालना देण्यासाठी पशू संवर्धन विकासतर्फे मार्गदर्शन कार्यशाळा या गावात घेण्यात आली. या संपूूर्ण उपक्रमासाठी खुद्द राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी पुढाकार घेतल्याबद्दल ग्राम विकास मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून तसे पत्र विजय दर्डा यांना ग्रामविकास मंत्रालयाकडून प्राप्त झाले आहे. स्थानिक विकास निधीतून तीन कोटींची कामे भारी येथे माजी खासदार विजय दर्डा यांनी दोन कोटी ६९ लाखांचा स्थानिक विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून महत्वपूर्ण अशी ११ कामे प्रस्तावित केली आहे. यात विद्युतीकरणासह सांस्कृतिक भवन, गावातील मोठा पूल, भूमिगत गटारे व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, उद्यान सीमेंट रस्ते, व्यायामशाळा, नाल्याचे सौंदर्यिकरण अशी महत्वपूर्ण कामे प्रस्तावित केली आहेत.