शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

शिक्षणात शिखरावर तरी नजर मातीवर...मातीतल्या माणसांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

लव किशोर दर्डा असे या तरुणाचे नाव आहे. त्यांनी बारावीनंतर व्हीआयटी वेल्लूर या नामांकित अभियांत्रिकी विद्यापीठातून शिक्षण घेतले. जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) या विषयात बीटेकची पदवी घेऊन इंग्लंडमधील जागतिक कीर्तीच्या शेफिल्ड विद्यापीठातून मॉलीक्युअर मेडिसिन या विषयात मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी ओरल (नाक, कान, घसा, तोंड, मेंदू) कॅन्सर या विषयात पीएचडी घेतली आहे.

ठळक मुद्देलव दर्डा : पीएचडी डॉक्टर होऊनही चोखाळली विषमुक्त शेतीची वेगळी वाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षणात यशाचे शिखर गाठल्यावर मातीकडे खाली झुकून पाहण्याची तसदी आजचे तरुण घेत नाही. उलट बक्कळ पैसा कमाविण्यासाठी उच्च पदस्थ नोकºया मिळविण्यासाठी किंवा उद्योजक होण्याचा मार्ग धुंडाळतात. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषीक्षेत्रात तल्लख बुद्धिमत्तेचे तरुण येत नसल्याने हे क्षेत्र आज विविध संकटांचा सामना करीत आहे. अशा वेळी यवतमाळातील एका तरुणाने मात्र शेतीची वेगळी वाट निवडली आहे. विषमुक्त भाजीपाला व फळे उगविण्याचा त्यांचा मनसुबा अनेकांसाठी जीवदान ठरणार आहे.लव किशोर दर्डा असे या तरुणाचे नाव आहे. त्यांनी बारावीनंतर व्हीआयटी वेल्लूर या नामांकित अभियांत्रिकी विद्यापीठातून शिक्षण घेतले. जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) या विषयात बीटेकची पदवी घेऊन इंग्लंडमधील जागतिक कीर्तीच्या शेफिल्ड विद्यापीठातून मॉलीक्युअर मेडिसिन या विषयात मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी ओरल (नाक, कान, घसा, तोंड, मेंदू) कॅन्सर या विषयात पीएचडी घेतली आहे.घरात शिक्षणाचे वारे, उच्च पदस्थ नोकरी पटकावणे तसे कठीण नव्हते. उद्योजक होण्याचा मार्गही फारसा कठीण नव्हता. पण त्यांनी शेतीची वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला. एकीकडे शेतीविषयी सर्वसामान्यांच्या मनात औदासिन्य असताना, या उच्चविद्याविभूषीत तरुणाने शेतीकडे मोर्चा वळविल्याने बºयाच जणांना आश्चर्य वाटले.कौन कहता हैं आसमान मे सुराग नही होताएक पत्थर तो तबियत से उछालो यारो...ही ध्येयासक्ती उराशी बाळगणारा माणूस कधीही मागे राहात नाही. मी शिकलो, मोठा झालो याचा गर्व न बाळगता मेहनतीची तयारी ठेवून त्यांनी वाटचाल सुरू केली आहे. पण शेती करतानाही ‘युनिकनेस’ शोधला. शेतीतून पिकणारा भाजीपाला, फळे नागरिकांना सुदृढ आरोग्य देणारे ठरावे, हा त्यांचा उद्देश आहे. त्यांनी विषमुक्त भाजीपाला, फळे उगविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सेंद्रीय शेतीवर त्यांनी भर दिला आहे. यवतमाळ शहरालगत भारी शेतशिवारात त्यांची शेती सध्या सकस भाजीपाला व फळांनी बहरली आहे. तेथून संपूर्णपणे विषमुक्त पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट यवतमाळात पोहोचतोय. या उच्चशिक्षित तरुणाच्या प्रयत्नामुळे यवतमाळकरांना शुद्ध, सकस, ताजा आहार मिळतोय. ज्या शेतीकडे कोणीही नकारात्मक नजरेने बघतो, तीच शेती आजच्या अनेक प्रश्नांची उकल करू शकते. हाच विश्वास बाळगून लव दर्डा यांनी शेतीला नवा आयाम अन् नागरिकांना औषधांपेक्षाही उत्तम आहार देण्याचा विडा उचलला आहे.

मी डॉक्टर... म्हणून विषमुक्त अन्नाचा पुरस्कर्ता ! याबाबत बोलताना लव दर्डा म्हणाले, मी शेतकरी असण्यासोबतच ओरल कॅन्सरचा पीएचडी डॉक्टर आहे. आज जगात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कारण आपण घेत असलेला आहार हा विषाक्त आहे. भाजीपाला असो किंवा फळपिक असो, प्रत्येक झाडावर विषारी रसायनांचा प्रचंड मारा केला जातो. घरी आणलेला भाजीपाला किंवा फळे धुवून टाकल्यावरही त्यातील विषारी घटक नष्ट होत नाही. अशा अन्नातून कॅन्सरसह इतरही आजारांचे आपण बळी ठरत असतो. औषधोपचारावर बेसुमार खर्च करूनही अनेकदा जीव जातो. ‘प्रिव्हेंशन इज बेटर द्यान क्यूअर’ असे आमच्या कॅन्सरच्या संशोधनाच्या क्षेत्रात म्हटले जाते. उपचारापेक्षा रोगच होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच उद्देशाने मी विषमुक्त शेती करीत असून त्यातून संपूर्ण शुद्ध अन्न नागरिकांना मिळावे, हा प्रयत्न आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणagricultureशेती