शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

आधी पीक कर्जाचे व्याज भरा, नंतर शासन देणार थेट भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

आतापर्यंत एक लाखापर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के, तर एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जाला केवळ दोन टक्के व्याज आकारले जात होते. तीन लाखांवरील कर्जाला वार्षिक पावणे अकरा टक्के व्याज आकारले जाते. झिरो टक्के आणि दोन टक्के व्याज असले तरी त्यातील फरकाची भरपाई शासन बॅंकांंना थेट देत होते. या कर्जाची वसुली शेतकऱ्यांकडून केली जात नव्हती, त्यांना अप्रत्यक्ष माफी अथवा कमी टक्क्याची सवलत मिळत होती. परंतु शासनाने आता या हंगामापासून या सवलत योजनेत काहीसा बदल केला आहे.

ठळक मुद्देयोजनेत बदल : थकबाकीदार वाढणार, नव्या कर्जाला मर्यादा, जिल्हा बॅंकेपुढे वसुलीचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पीक कर्जावरील व्याजाच्या योजनेत शासनाने बदल केल्याने आता कर्जासोबतच व्याजाचीही वसुली बॅंका शेतकऱ्यांकडून करणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून यथावकाश या व्याजाची रक्कम बॅंक खात्यात जमा हाेणार आहे. या नव्या पॅटर्नमुळे पीक कर्जासह व्याजाच्या वसुलीचे आव्हान अन्य बॅंकांसह  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेपुढे उभे राहणार आहे. आतापर्यंत एक लाखापर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के, तर एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जाला केवळ दोन टक्के व्याज आकारले जात होते. तीन लाखांवरील कर्जाला वार्षिक पावणे अकरा टक्के व्याज आकारले जाते. झिरो टक्के आणि दोन टक्के व्याज असले तरी त्यातील फरकाची भरपाई शासन बॅंकांंना थेट देत होते. या कर्जाची वसुली शेतकऱ्यांकडून केली जात नव्हती, त्यांना अप्रत्यक्ष माफी अथवा कमी टक्क्याची सवलत मिळत होती. परंतु शासनाने आता या हंगामापासून या सवलत योजनेत काहीसा बदल केला आहे. यानुसार आता बॅंका शेतकऱ्यांकडून शून्य व दोन टक्के व्याजातील उर्वरित फरकाची थेट वसुली करेल. कुण्या शेतकऱ्याकडून किती व्याज वसूल केले गेले, याची यादी शासनाला सादर करेल, त्यानंतर शासन यथावकाश (किमान एक-दोन वर्षात) व्याजाची ही बॅंकांनी वसूल केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करेल. व्याज माफीचा हा नवा पॅटर्न बॅंकांसह शेतकऱ्यांसाठीही अडचणीचा ठरणार आहे. कारण बॅंकांना शेतकऱ्यांकडून कर्जासह व्याजाचीही वसुली करावी लागणार आहे. मग शेतकऱ्यांना व्याजाची ही रक्कम शासनाकडून मिळविण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागले. एकट्या यवतमाळ जिल्हा बॅंकेचा विचार केल्यास  सुमारे ५० हजार शेतकऱ्यांकडील व्याजाची ही रक्कम केवळ खरीप हंगामात ५० कोटींच्या घरात जाते. जेथे मूळ पीक कर्जच वसूल होत नाही, तेथे व्याजाची रक्कम कशी वसूल होणार असा प्रश्न आहे. पर्यायाने बॅंकेची थकबाकी वाढेल, शेतकरी थकबाकीदार दिसेल, त्यामुळे नव्या पीक कर्जाला तो पात्र ठरणार नाही. ही नवी गुंतागुंत सर्वांसाठीच अडचणीची ठरणार आहे. गेल्या हंगामात जिल्हा बॅंकेने पाचशे कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. त्यापैकी मार्च अखेरीस ८० टक्के अर्थात ४०० कोटी रुपयांच्या पीक कर्जाची वसुली अपेक्षित आहे. आतापर्यंत केवळ सात कोटी रुपये वसूल झाले आहेत. शेतकरी मार्चच्या तोंडावर थकबाकी भरत असल्याने हा आकडा सध्या कमी दिसत असल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले. जिल्हा बॅंकेच्या मुदती कर्जाची थकबाकी २५ कोटींच्या घरात आहे. याशिवाय बिगर शेती कर्ज ४० ते ४५ कोटी थकीत आहे. त्यात वसंत सहकारी साखर कारखान्याच्या ३५ कोटींचा समावेश आहे. याशिवाय काही जिनिंग - प्रेसिंगकडेही थकबाकी आहे.  

जिल्हा बॅंकेच्या नव्या अध्यक्षांपुढील आव्हाने वाढणार  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा नवा अध्यक्ष ४ जानेवारी रोजी निवडला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी अनेकांची मोर्चेबांधणी सुरू असली तरी नवा अध्यक्ष हा शेतकऱ्यांचे आणि बॅंकेचेही हित पाहणारा असावा, केवळ वैयक्तिक स्वार्थ व कार्यकर्ते - मतदारांचे हित पाहणारा नसावा, असा सूर आहे. नव्या अध्यक्षांपुढे बॅंकेचा गेल्या १३ वर्षात डबघाईस आलेला कारभार सुधारणे, शेतकऱ्यांमध्ये ‘आपली बॅंक’ हा विश्वास निर्माण करणे, कारभारात पारदर्शकता आणणे, बॅंकेचा विकास करणे, शेतकरी हिताचे निर्णय घेणे, कर्ज, व्याजाची वसुली करून भांडवल - ठेवी वाढविणे, भ्रष्टाचाराचा लागलेला डाग पुसणे, नोकरभरती ‘कोटा’ पद्धत न राबविता पारदर्शक पद्धतीने पार पाडणे, अशी विविध आव्हाने राहणार आहेत. ही सर्व आव्हाने पेलणारा सक्षम, अनुभवी आणि सर्वांना घेऊन चालणारा अध्यक्ष बॅंकेला मिळतो का, की नेता ठरवेल तोच चेहरा मिळतो, याकडे जिल्हाभरातील शेतकरी आणि बॅंकेच्या यंत्रणेचे लक्ष लागले आहे. गेली १३ वर्षे बॅंकेत ‘मिलीभगत’ कारभार चालला. ‘अर्थ’कारणामुळे बॅंक बदनाम झाली. प्रकरणे कोर्टात गेली, किमान आता तरी सत्ताधारी नेत्याशी भिडणारा खमक्या अध्यक्ष बॅंकेला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक