शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये अवतरली पंढरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:17 IST

आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी शहरात अवघी पंढरी अवतरली होती. येथील विठ्ठल मंदिरात वैष्णवांचा मेळा भरला होता. विठुनामाच्या गजराने शहर भारावून गेले होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

ठळक मुद्देआषाढी एकादशी : विठ्ठल मंदिरात मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी शहरात अवघी पंढरी अवतरली होती. येथील विठ्ठल मंदिरात वैष्णवांचा मेळा भरला होता. विठुनामाच्या गजराने शहर भारावून गेले होते.विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या मंदिरात शहरातील भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जुन्या वस्तीतील ज्ञानेश्वर संस्थानच्या विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. पहाटे ४ वाजता पंचामृताने विठुरायाचा महाभिषेक करण्यात आला. ६ वाजता महाआरती तर ७ वाजता ज्ञानेश्वरीचे सामूयिक पारायण झाले. ८.३० वाजतापासून सायंकाळपर्यंत भजन व भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.ज्ञानेश्वर मंदिर संस्थानतर्फे यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच नागरिकांकडून देहदानाचे संकल्प पत्र भरून घेण्यासाठी स्टॉल लावण्यात आले. झाडे लावा-झाडे जगवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, करा योग-रहा निरोग, पाणी अडवा-पाणी जिरवा आदींचे फलक लावून भाविकांमध्ये जनजागृती करण्यात आली. भाविकांची मोफत चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त बसस्थानक-गुजरी चौक ते परत बसस्थानकापर्यंत भाविकांना मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दिव्यांग भाविकांसाठी व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यांना थेट दर्शनाचा लाभ देण्यात आला. कार्यक्रमासाठी ११०० सेवाधारी, मंदिर प्रशासनाचे कर्मचारी तैनात होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी