शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाजनादेश यात्रेचा मार्ग दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 21:32 IST

तालुक्यातील वडकी-खडकी आणि खैरी ते माढळी रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. याच मार्गाने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार आहे, हे विशेष. त्यामुळे या मार्गाची आता तातडीने दुरूस्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देवडकी-खैरी-माढळी रस्ता : पोलिसांकडून पाहणी, बांधकामला विविध सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यातील वडकी-खडकी आणि खैरी ते माढळी रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. याच मार्गाने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार आहे, हे विशेष. त्यामुळे या मार्गाची आता तातडीने दुरूस्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.वडकी ते खडकी आणि खैरी ते माढळी दरम्यानच्या रस्त्याची स्थिती पावसानंतर अत्यंत दयनीय झाली आहे. या दोन्ही मार्गाची तातडीने दुरूस्ती करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे ५ आॅगस्टला याच मार्गावरून मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा तालुक्यात येणार आहे. वडकी-खडकी हा केवळ तीन किलोमीटरचा मार्ग आहे. राळेगाव-वडकी रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाला असला, तरी या तीन किलोमीटरपैकी जवळपास एक किलोमीटरचा रस्ता अद्याप डांबरीच आहे. पहिल्या पावसामुळे या भागात वाढलेल्या मोठ्या प्रमाणावरील जड वाहतुकीमुळे व रेतीच्या जड वाहनांमुळे रस्त्याची एैसीतैसी झाली आहे. वैध आणि अवैध वाहतुकीमुळे या मार्गावर विपरित परिणाम झाला आहे.रिधोरा फाटा व वाढोणाबाजार गावाजवळ सिमेंट रोड कंत्राटदार कंपनीने नवीन पुलाची बांधणी केली. मात्र या पुलांना जोडणारे अ‍ॅप्रोच रोड अद्यापही बांधण्यात आले नाही. त्यामुळे वाहतूक जुन्याच डांबरी रस्त्यावरून होत आहे. या ठिकाणचे डांबरी रस्तेही दयनीय झाले आहे. खैरी ते माढळी हा मार्ग सुरूवातीस जवळपास ८-१० किलोमीटरपर्यंत दयनीय होता. तेथे वारंवार चिखल साचतो. वाहने स्लिप होतात. रस्त्याखाली घसरतात, उलटतात. त्यामुळे अनेकदा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. हा मार्ग मारेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित येतो. या विभागाचे रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. यात्रेच्या निमित्ताने रस्त्याची दुरुस्तीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यात्रेच्या निमित्ताने पोलिसांकडून रस्त्याची पाहणीमाढणी ते खैरी मार्गानेच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा राळेगाव तालुक्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्याची अप्पर पोलीस अधीक्षक नरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, वडकीचे ठाणेदार प्रशांत गीते यांनी पाहणी केली. वडकीनंतर खडकीमार्गेच मुख्यमंत्री राळेगावाला पोहोचणार आहे. त्यामुळे या मार्गाची सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. पोलीस विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला यो दोन्ही रस्त्यांच्या दुरूस्ती, डागडुीजी संदर्भात आवश्यक सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा