यवतमाळ : सोयाबीनचे पीक बुडाले, कपाशीही संकटात आहे. असे असताना जिल्ह्याची नजर पीक पैसेवारी ६३ पैसे काढण्यात आली. पालकमंत्री व जिल्हाधिकारीसुद्धा पीक परिस्थिती उत्तम असल्याचे सांगत आहे. शेतकऱ्यांची अवस्था व पिकांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी पैसेवारीचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत बुधवारी एकमताने पारित करण्यात आला. पीक स्थिती पाहण्यासाठी मंत्री व प्रशासनाने गावागावांत प्रत्यक्ष भेटी देण्याचे आवाहनही करण्यात आले. जिल्ह्यात केवळ दोन गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखविण्यात आली हे विशेष. या बैठकीत अन्य विषयही गाजले. एक गाव दोन तालुक्यात विभागल्या गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य व विस्तार अधिकाऱ्यांनी त्या गावात भेटी द्याव्या व गावकऱ्यांंना नेमके कोणत्या तालुक्यात राहणे सोईचे आहे, हे जाणून घ्यावे, असेही सभेत ठरले. अंजनखेड येथील १५ लाखांच्या पाणी पुरवठा योजनेला लागलेले तांत्रिक ग्रहण सोडविण्यासाठी चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत एका शिक्षकाची बदलीही गाजली. (शहर वार्ताहर)
पैसेवारीचे फेरसर्वेक्षण करा
By admin | Updated: October 22, 2015 04:04 IST