शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

साहेबांच्या बंगल्यापुढे पार्किंग

By admin | Updated: July 23, 2015 02:27 IST

तहसीलदारांच्या येथील शासकीय निवासस्थानासमोरच बिनदिक्कतपणे चार चाकी अनेक वाहने उभी दिसतात.

तालुका दंडाधिकारी : थातूरमातूर कारवाईचा देखावावणी : तहसीलदारांच्या येथील शासकीय निवासस्थानासमोरच बिनदिक्कतपणे चार चाकी अनेक वाहने उभी दिसतात. मात्र त्याविरूद्ध थातूरमातूर कारवाई करून कारवाईचा केवळ देखावा निर्माण केला जातो. शहरातील तहसील चौक परिसरात तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान आहे. त्यात तहसीलदार वास्तव्य करतात. याच निवासस्थानासमोर बाहेरगावावरून येणारे चार चाकी वाहन किंवा इतर मालवाहू वाहन उभे केले जातात. अनेकदा तर दिवसभर अशी वाहने तेथे बिनदिक्कतपणे उभे दिसतात. अनेक दुचाकीही तेते उभ्या असतात. चक्क तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानासमोरच वाहन चालक पार्किंग करीत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून वाहन चालक तेथेच वाहनांची पार्किंग करीत आहे.हा प्रकार तहसीलदारांना नेहमी दृष्टीस पडतो. अनेकदा तर तहसीलदार पायदळच कार्यालयात पोहोचतात. निवासस्थान आणि कार्यालय अत्यंत नजिक असल्याने ते पायदळ जाणे पसंत करतात. त्यावेळी त्यांनाही तेथे पार्किंग केलेल्या वाहनांपासून बचाव करीत कार्यालयात पोहोचावे लागते. मात्र तरीही वाहन चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत नाही. परिणामी वाहन चालकांची मुजोरी चांगलीच वाढत आहे. शासकीय निवासस्थानासमोर आता उभ्या राहणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात दररोज बाहेरगावावरून मालवाहू ट्रक मोठ्या प्रमाणात येतात. त्यापैकी काही वाहने तहसील कार्यालयाकडून तहसीलदारांच्या निवासस्थानासमोर वरोराकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूने उभे राहतात. त्यामुळे अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या मार्गाने लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थीसुद्धा महाविद्यालयात जातात. त्यांनाही या वाहनांचा त्रास सहन करावा लागतो.या निवासस्थानासमोरच धान्याचे शासकीय गोदाम आहे. या गोदामाला वृक्षांनी वेढा दिला आहे. गोदाम परिसरात खुली जागा असल्याने अनेक वाहने त्या जागेवरही ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता त्वरेने कारवाई करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा वाहन चालक मुजोर होतील. (कार्यालय प्रतिनिधी)