शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पालकांनी सूचविल्या उपाययोजना

By admin | Updated: July 2, 2016 02:34 IST

यवतमाळ पब्लिक स्कूलमधील (वायपीएस) छेडखानीच्या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐेरणीवर आला ...

‘त्या’ घटनेनंतरची सावधगिरी : ‘वायपीएस’मधील प्रकरण यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमधील (वायपीएस) छेडखानीच्या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐेरणीवर आला असून त्या दृष्टीने नागरिकांनी अनेक उपाययोजना सूचविल्या आहेत. यवतमाळ पब्लिक स्कूलमधील यश निलमचंद बोरूंदिया व अमोल अरुण क्षीरसागर या दोन शिक्षकांवर विद्यार्थिनींच्या छेडखानीचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने या दोनही शिक्षकांना तातडीने वडगाव रोड पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांना शाळेतून बडतर्फ केले. या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राधिका ले-आऊटमधील गणपती मंदिरात शेकडो नागरिक व पालक एकत्र आले. त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. दिवसभरातील चर्चेतून अनेक सूचना पुढे आल्या. या सूचनांचे एक निवेदन शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे ठरले आहे. दुपारी काही महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केल्याचे सांगितले जाते. सायंकाळी महिला व बाल कल्याण समितीद्वारे तक्रारकर्त्या पालकांची बयाने नोंदविली गेली. यावेळी तेथे नागरिकांनी गर्दी केली होती. वडगाव रोड पोलिसांनी गुरुवारी व आज शुक्रवारीसुद्धा यवतमाळ पब्लिक स्कूलचे प्राचार्य जेकब दास यांना पाचारण करून त्यांची चौकशी केली. पोलिसांनी त्या दोन शिक्षकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आता भादंविच्या कलम ३७६ (ख) या कलमाची भर घातली आहे. शुक्रवारी दुपारी यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी यवतमाळ पब्लिक स्कूलला भेट दिली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते यांनी शाळेत भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला होता. अशा आहेत नागरिकांच्या शाळेसाठी सूचनामुलींच्या गणवेशात बदल करण्यात यावे (मुलींना जे सुविधाजनक असेल असा गणवेश त्यांना घालण्यासाठी द्यावा), गणवेश निवडीची प्रक्रिया काही पालक वर्गांना सोबत घेऊन चर्चा करावी.सीसीटीव्हीवरून येणाऱ्या डिस्प्ले सर्वांना पाहता येईल यासाठी शाळेबाहेर एका ठिकाणी व्यवस्था करावी. नृत्य, कला, खेळ आणि संगीत या गतिविधींकरिता मुलींसाठी वेगळ्या महिला शिक्षक नेमाव्या. प्राथमिक शाळेवर म्हणजे पाचवीपर्यंत कोणत्याही पुरुष शिक्षकाला नेमणूक देऊ नये.प्रत्येक वर्गात मुला-मुलींसाठी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात यावी.मुला-मुलींच्या प्रसाधनगृहाबाहेर नियमित निगराणीकरिता एका जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी.एकट्या मुलीला किंवा मुलाला कोणत्याही विषयावरील चर्चेसाठी शिक्षकाने एकांतामध्ये बोलावू नये. शाळेच्या वेळेनंतर चालविले जाणारे अतिरिक्त क्लासेस तत्काळ बंद करावे.शाळेतील गैरप्रकाराबाबत तक्रार आल्यास प्राचार्याने शांतपणे ऐकून घेऊन समाधान करावे.