शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’मध्ये ‘पेस क्लब’तर्फे पालक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:42 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या पेस क्लबतर्फे पालक सभा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या पेस क्लबतर्फे पालक सभा घेण्यात आली. प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर अध्यक्षस्थानी होते. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख प्रा.जे.एच. सातूरवार, प्रथम वर्ष प्रभारी प्रा.व्ही.आर. गंधेवार प्रामुख्याने उपस्थित होते.माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर यांनी मार्गदर्शन करून पालकांच्या विविध प्रश्नांचे निराकरण केले.प्रा.जे.एच. सातूरवार यांनी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेचे महत्त्व सांगून विविध सुविधा व नियमावलीची माहिती दिली. विद्यार्थ्यांची प्रतिभा उंचावण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी सीएसआय क्लब आणि पेस क्लब कार्यरत असल्याचे ते म्हणाले. प्रा.व्ही.आर. गंधेवार यांनी समयोचित मार्गदर्शन केले.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि पुरस्काराबद्दल पालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये कैलेश गव्हाणकर, सुनील समदूरकर, मृणाल बिहाडे, राजेश अंगाईतकर, अनिता कोरचे यांचा समावेश आहे. शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती व प्रगती अहवाल पालकांपुढे सादर करण्यात आला. संचालन प्रा.एम.के. पोपट यांनी केले. यशस्वीतेसाठी पेस क्लबचे प्रभारी प्रा.पी.पी. लोकुलवार, उपप्रभारी प्रा.ए.ए. वंजारी आदींनी पुढाकार घेतला. सभा आणि उपक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा व सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.