शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेपर अर्ध्यातूनच रद्द; विद्यार्थी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 06:16 IST

वनविभागाने वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

यवतमाळ : वनविभागाने विविध पदांसाठी भरतीप्रकिया सुरू केली. यात रविवारी वनरक्षक पदासाठी आॅनलाईन पेपर घेण्यात आला. मात्र अचानक अर्ध्यातूनच पेपर रद्द करण्यात आल्याने उमेदवार संतप्त झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी धडक दिली. मात्र सुटीमुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट न झाल्याने आता उमेदवार सोमवारी त्यांना निवेदन देणार आहे.

वनविभागाने वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी रविवारी महापोर्टलमार्फत आॅनलाईन परीक्षा घेण्यात आली. येथील डॉ.भाऊसाहेब नंदूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयात हा आॅनलाईन पेपर घेण्यात आला. सकाळी ११ वाजताचा पेपर तब्बल दोन तासांनी म्हणजे १ वाजता सुरू झाला. पहिल्या पाळीतील उमेदवारांचा पेपर सुरळीत पार पडला. यानंतर दुसºया पाळीतील उमेदवारांना दुपारी २:३० वाजता पेपर देण्यात आला. मात्र वनविभागाने अचानक हा पेपर अर्ध्यातच रद्द केला.ही परीक्षा राज्य शासनाच्या माहापोर्टलवरून राबविण्यात आली. परीक्षेची संपूर्ण जबाबदारी महापोर्टलची आहे. परीक्षा घेताना महापोर्टलला यात तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे पेपर अर्ध्यातून रद्द झाला. मात्र २५० विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा घेतला जाईल.- विपूल राठोड, सहाय्यक वनसंरक्षक, यवतमाळ

टॅग्स :forest departmentवनविभागYavatmalयवतमाळ