शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

साथीच्या रोगांचे थैमान

By admin | Updated: October 11, 2014 23:14 IST

सध्या तालुक्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यात गर्दी

वणी : सध्या तालुक्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यात गर्दी सतत वाढत आहे.तालुक्यातील नांदेपेरा, मंदर परिसरात डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. नांदेपेरा येथे डेंग्यूसदृश तापाने मधुकर अंड्रस्कर, शीतल बोधे या दोघांना बंडवून सोडले आहे. मात्र आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्याने त्यांना चंद्रपूर येथील खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागली आहे. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. नांदेपेरा येथे गावातील घाणीमुळे डासांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी या गावात मलेरिया, डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.सुरुवातीला आरोग्य विभागाच्या कर्मचारऱ्यांनी नांदेपेरा येथे पोहोचून रुग्णांची तपासणी केली. या कर्मचाऱ्यांनी गावात घाण निर्माण करणाऱ्याची नावेही नोंदविली होती. तथापि, अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. तेथील ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे ही कारवाई रखडली, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. प्रशासक मात्र अत्यंत सुस्तच आहे. त्यांना गावाशी काहीच घेणे-देणे दिसत नाही. गावातील किमान घाण स्वच्छ करण्याबाबतही ते प्रचंड उदासीन दिसत आहे. अशीच काहीशी परिस्थिती तालुक्यातील मंदर येथे निर्माण झाली आहे. नुकतीच या परिसरातील एक महिला डेंग्यूसदृश आजाराने दगावली आहे. संबंधित महिलेवर प्रथम वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र नंतर त्या खासगी डॉक्टरने त्या महिलेला चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. तेथे उपचारादरम्यानच त्या महिलेचा मृत्यू झाला. परिणामी संबंधित कुटुंबाला आर्थिक भुर्दंडासोबतच जीवित हानीला सामोरे जावे लागले. मंदर येथेही डेंग्यूसदृश तापाने ग्रामस्थ वैतागले आहेत. मलेरिया, टायफाईड आदी तापांनी जनता हैराण आहे. गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र ग्रामपंचायत उदासीन आहे. साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या गावातही साथ रोग बळकावत आहे. अनेक रूग्ण खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र शासकीय आरोग्य विभाग दिसेनासा झाला आहे. आरोग्य यंत्रणेचे या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या गावात कोणत्याही प्रभावी उपाययोजना आरोग्य विभागाने राबविल्या नाहीत. ग्रामपंचायतीने साधी नाली सफाई केली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)