शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पोषण आहाराला ब्रँडेड कंपनीचे पॅकिंग

By admin | Updated: March 22, 2015 02:02 IST

शालेय पोषण आहाराचा तांदूळ असलेल्या पोत्याला कोणताही धक्का न लावता पद्धतशीर तांदूळ काढला जातो.

यवतमाळ : शालेय पोषण आहाराचा तांदूळ असलेल्या पोत्याला कोणताही धक्का न लावता पद्धतशीर तांदूळ काढला जातो. दुसऱ्या पोत्यात तांदूळ भरून काळ््या बाजारात विक्री होते, यावर विश्वास बसत नाही ना ? मात्र हे सत्य आहे. यवतमाळात एका धान्य गोदामावर पोलिसांनी धाड मारली, तेव्हा पोत्यातून तांदूळ काढण्याची पद्धत पाहून पोलीसही अचंबित झाले. चिमुकल्यांच्या तोंडचा घास पळविणारे आता पोलिसांच्या तावडीत सापडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यासाठी शासनाच्यावतीने तांदूळ आणि इतर साहित्याचा पुरवठा केला जातो. या पुरवठ्याचे कंत्राट यवतमाळातील हर्षद बेग यांना देण्यात आला आहे. त्यांनी धान्य माल साठविण्यासाठी पांढरकवडा मार्गावर गोदाम भाड्याने घेतले आहे. याच गोदामातून तांदूळाला पाय फुटत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. घाटंजीला विक्रीसाठी जाणारा तांदूळ पोलिसांनी पकडला. वाहनचालक आणि व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गोदामाची झडती घेतली, आणि या गोदामात सुरू असलेला प्रकार पाहून पोलीसही स्तब्ध झाले. तांदूळाच्या पोत्याचे सील न तोडता प्लास्टिकच्या एका जम्बो नळीने त्यातून तांदूळ काढले जाते. तासाभरात ५० किलोच्या पोत्यातून १५ किलो तांदूळ बाहेर येतात. मात्र याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही. शासनाकडून आलेल्या विशिष्ट पोत्यातील तांदूळ साध्या पोत्यांमध्ये भरले जाते आणि ते सरळ काळ््या बाजारात विकले जाते. तर शाळेला १० ते १५ किलो धान्य काढलेले पोते पुरविले जाते. सुतळीपासून बनविलेल्या पोत्यावर तांदूळाचे वजन लिहिलेले असते. ५० किलो नेट वजनाचे हे पोते असते. मात्र शाळेत उतरविताना त्याचे वजन ३५ ते ४० किलो भरते परंतु पोते सीलबंद असल्याने कुणीही संशय घेत नाही. मुख्याध्यापकही ५० किलो वजनाचे पोते मिळाले असे लिहून देतात. तसेच शाळेत पोते उतरविताना पुरवठादाराचे खास माणसे घाईगडबडीत पोते उतरवून घेतात. मात्र या पोत्यात किती किलो धान्य आहे याचा थांगपत्ता लागत नाही. चिमुकल्यांच्या तोंडचा घास पळविण्यात एकटा कंत्राटदारच गुंतला असेल असे नाही. यात मोठी साखळीही असू शकते. या साखळीचा शोध घेतल्यास बडे मासेही गळाला लागण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर) यंत्रणा बेसावधजिल्हाभरातील विद्यार्थ्यांना वितरित होणोर पोषण आहाराचे धान्य कोणत्या गोदामात आहे, ते सुरक्षित आहे का, धान्य घेऊन जाणारे वाहन किती किलो धान्य घेऊन जाते. नोंदी प्रमाणे धान्य भरले जाते का याची गत चार वर्षात कधीही तपासणी झाली नाही. आणि याच बाबीचा फायदा पुरवठादाराने घेतला. गावाबाहेर गोदामशालेय पोषण आहाराचा तांदूळ ठेवण्यासाठी पुरवठादाराने खास गावाबाहेरचे गोदाम निवडले आहे. येथील पांढरकवडा परिसरात विरळ वस्तीत असलेल्या गोदामात धान्याची रिफिलिंग गेली जाते. मात्र कुणालाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. तसेच गोदामातून साठा रजिस्टरच बेपत्ता आहे. सर्वच अनभिज्ञ विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे धान्य शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत उतरवून घेणे आवश्यक असते. परंतु या बाबीपासूनच शाळा व्यवस्थापन समिती अनभिज्ञ आहे. नेमके किती धान्य आले, पोते वजनाप्रमाणे होते काय याचा कुणालाही थांगपत्ता लागत नसल्याचे दिसते.