शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

सहायक आयुक्तांमुळे अडली समाजकार्यची थकबाकी

By admin | Updated: August 20, 2016 00:32 IST

समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपासून वंचित

यवतमाळ : समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपासून वंचित ठेवण्यात समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्तच जबाबदार असल्याचा ठपका अमरावतीच्या प्रादेशिक उपायुक्तांनी ठेवला आहे. या प्रकरणी प्राध्यापकांच्या तक्रारीवरून समाजकल्याण आयुक्तांनी चौकशीचे निर्देश दिले होते. आता या प्रकरणी सहाय्यक आयुक्तांवर काय कारवाई होते आणि प्राध्यापकांची थकबाकी केव्हा मिळते याकडे लक्ष लागले आहे. पुसद येथील गुलामनबी आझाद समाजकार्य महाविद्यालय व सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपासून वंचित होते. त्यांनी यवतमाळच्या सहाय्यक आयुक्त विजय साळवे यांच्याकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला. परंतु उपयोग झाला नाही. उलट या कर्मचाऱ्यांना सहाय्यक आयुक्तांनी लाच मागितल्याचा आरोप करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्यावरून आयुक्तांनी अमरावती येथील प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असता, सदर कर्मचाऱ्यांची थकबाकीची देयके वेळीच कोषागारात सादर करून कोषागाराकडून देयके मंजूर झाली आहे. परंतु सहाय्यक आयुक्तांनी प्राप्त देयकाचे बीडीएस काढले नाही. त्यामुळे एक कोटी ५३ लाख ३६ हजार ३६० रुपये शासन समर्पित झाले. यावरून तक्रारकर्त्या दोन्ही महाविद्यालयाच्या देयकाचे बीडीएस काढण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. संबंधित महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचे दिसून येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आता या प्रकरणी समाजकल्याण आयुक्तालय यवतमाळच्या सहाय्यक आयुक्तांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विजय साळवे यांची बदली झाली आहे. या बदलीविरोधात साळवे यांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे. वेतन फरकाची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केल्याचा ठपका साळवे यांच्यावर चौकशीतून ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याऐवजी केवळ बदली करूनच प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले. आता साळवे यांच्याबाबत समाजकल्याण आयुक्त पुणे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (कार्यालय प्रतिनिधी)