शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

By admin | Updated: July 3, 2015 00:18 IST

तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सार्वत्रिक सर्वेक्षण करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने नियोजन केले आहे.

सुक्ष्म नियोजन : सतत १२ तास राबविणार मोहीममारेगाव : तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सार्वत्रिक सर्वेक्षण करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने नियोजन केले आहे. ही सर्र्वेक्षण मोहीम सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत चालणार आहे.या उपक्रमात महसूल, सामाजिक विकास, ग्रामविकास, महिला व बालविकास, आदिवासी विकास अल्पसंख्याक विभाग, आरोग्य विभाग अशा सर्व विभागांना सहभागी होण्याचे निर्देश आहेत. या सर्र्वेक्षणाची प्रत्यक्ष जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, सर्वशिक्षा अभियानानातील कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली. ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलाच नाही, ज्याने शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेच नाही, अशा ६ ते १४ वयोगटातील बालकांचा समावेश शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये होतो. सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. ४ जुलैला घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, तळागाळातील झोपडपट्टी, खेडे गाव, वाड्या, पोड, तांडे, शेतमळे, जंगल वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या बालकांचाही यात समावेश आहे. तालुकास्तरीय सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष तहसीलदार आहेत. तालुक्यात ९७ महसुली गावे (पोड, तांडे वगळून) आहे. एकूण कुटुंब संख्या १९ हजार ७७६ आहे. या सर्वेक्षणासाठी केंद्र व सर्कलनिहाय गावे निवडण्यात येणार आहे. त्यासाठी १६ झोनल अधिकारी, २८८ सर्वेअर नियुक्त करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी जी.एल.खोले यांनी सांगितले. तालुकास्तरीय समितीत तहसीलदार, गटविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास अधिकारी, शासकीय कामगार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि सदस्य सचिव म्हणून गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. सर्वेक्षणासाठी गावस्तरावर नियुक्त समितीमध्ये सरपंच, प्रशासक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, सेवाजेष्ठ मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. आता ४ जुलैला तालुक्यात किती शाळाबाह्य विद्यार्थी मिळतील व त्यांना शालेय प्रवाहात कसे समाविष्ट केले जाईल, हे कळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)