शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

सखी मंचच्यावतीने जोश-२०१६ चे आयोजन

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

सखी वर्षभर ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत असतात त्या सखी मंचच्या ‘जोश’ कार्यक्रमाचे आयोजन ७

 यवतमाळ : सखी वर्षभर ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत असतात त्या सखी मंचच्या ‘जोश’ कार्यक्रमाचे आयोजन ७ आणि ८ जानेवारी २०१६ रोजी येथील दर्डा मातोश्री सभागृहात करण्यात येत आहे. दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी विविध स्पर्धा आयोजित आहे. लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने जोश-२०१६ अंतर्गत पहिल्या दिवशी ७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजतापासून विविध स्पर्धांना प्रारंभ होणार आहे.भुली बिसरी यादेजोश अंतर्गत दुपारी १ वाजता भुली बिसरी यादे या गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत केवळ जुन्या हिंदी चित्रपटातील १९८० पर्यंतचे गीत सादर करावे लागतील. स्पर्धकाला गाणे सादर करण्यासाठी दोन मिनिटाचा वेळ देण्यात येईल. स्पर्धेच्या ठिकाणी कुठलेही वाद्य राहणार नाही. गाणे पाहून किंवा मुकपाठ म्हणता येईल. सूर, ताल, लय, हावभाव आणि गीताचे बोल यावर गुण दिले जातील. प्रकल्प अधिकारी म्हणून राखी खत्री (९८२३९०५६००), प्रगती धुर्वे (९८२३४१७५५१) काम पाहत आहे. जरा चखकर देखो मटरचे नमकीन व्यंजन स्पर्धा ‘जरा चखकर देखो’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी व्यंजन घरुन करून आणावे लागतील. पदार्थांमध्ये मटरचा वापर जास्तीत जास्त असाव. सजावटीसाठी दहा मिनिटांचा वेळ दिला जाईल. सजावटीसाठी केवळ खाद्य पदार्थांचाच वापर करता येईल. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य घरुन आणावे लागतील. स्वाद, निटनेटकेपणा, डेकोरेशन, नाविन्य पूर्णत: यावर गुण दिले जातील. प्रकल्प अधिकारी म्हणून कविता लढ्ढा (९५०३५३२९९९), दीपा लिंगावार (९६७३८०१८१५) काम पाहत आहे. ओटी सजावो स्पर्धासखी मंचच्यावतीने ओटी सजावो ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून वधू मुलीची ओटी सजवायची आहे. ओटी घरुन सजवून आणावी लागेल. सजावटीसाठी १० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. ओटीमध्ये मखाणे, बत्ताशा, ड्रायफूट, तांदूळ, हळकुंड, सुपारी, खारीक आदी साहित्याचा वापर करावा लागेल. साज-सज्जा, निटनेटकेपणा यावर गुण दिले जातील. प्रकल्प अधिकारी म्हणून नीलिमा शर्मा (८७९३४५३७०९), जयश्री तांबोळी (९४२१४८४५५४) काम पाहत आहे. भाषण स्पर्धाजोश स्पर्धेअंतर्गत भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ‘मोबाईल संस्कृतीचा मुलांवर होणारा परिणाम’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी दोन मिनिटांचा वेळ देण्यात येईल. स्पर्धकाची स्टेज डेअरिंग, बोलण्याचे लकब आणि सादरीकरण यावर गुण दिले जातील. या स्पर्धेसाठी प्रकल्प अधिकारी म्हणून शुभदा हातगावकर (९८९०७७९४३४), स्मिता गंधे (८८८८४८४५७०) काम पाहत आहे. रांगोळी स्पर्धासखींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निसर्ग, बेटी बचाव, दहशतवाद या विषयावर सखींना रांगोळी साकारावयाची आहे. स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य घरुन आणावे. स्पर्धा स्थळी दोन बाय दोन फुटाची जागा रांगोळी साकारण्यासाठी देण्यात येईल. रांगोळी काढण्यासाठी ४० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. काच, मोती या सारख्या अतिरिक्त वस्तूंचा वापर करता येईल. विषयाची मांडणी, निटनेटकेपणा आणि कलात्मकता यावर गुण देण्यात येईल. प्रकल्प अधिकारी म्हणून माणिक भोयर (९४०५१६४३८९), स्मिता नागदिवे (९४२०२४६६०१) काम पाहत आहे. वेशभूषा स्पर्धाजैसा देश वैसा भेस या थिमवर वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना राजस्थानी, मारवाडी, मराठी, गुजराती, वेस्टर्न आदी वेशभूषा साकारता येईल. ज्या वेशभूषेत असाल त्याच भाषेत बोलणे आवश्यक आहे. आत्मविश्वास, साज-सज्जा, बोलणे यावर गुण दिले जातील. प्रत्येक स्पर्धकाला एक मिनिटाचा वेळ देण्यात येईल. प्रकल्प अधिकारी म्हणून नलिनी हांडे (८६०५४४१४१६), पुष्पा पारसकर (९५०३४४१८६२) काम पाहत आहेत. यानंतर हौजी गेमचे आयोजन सखींसाठी करण्यात आले आहे. वरील सर्व स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार दिले जातील. या स्पर्धा केवळ सखी मंच सदस्यांसाठी असून नवीन वर्षात सदस्य झालेल्या सखीही यात सहभागी होऊ शकतात. सखी मंचच्या जोश स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केले आहे. (उपक्रम प्रतिनिधी)‘जरा नच के दिखा’ स्पर्धा४जोश अंतर्गत सायंकाळी ६.३० वाजता जरा नच के दिखा ही एकलनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन गटात असून पहिला गट १८ ते ३० वयोगटासाठी तर दुसरा गट ३० च्यावर वयोगटासाठी राहणार आहे. हिंदी फिल्मी गाण्यांवर नृत्य सादर करावे लागेल. नवीन-जुने कोणतेही गाणे चालेल. गाण्याची सिडी घरुन आणावी लागेल. स्पर्धकांना घरुन तयार होऊन यावे लागेल. रुमाल, छत्री, दोरी, काठी या पैकी एका वस्तूचा प्रॉप म्हणून वापर आवश्यक करावा लागेल. नृत्य सादरीकरण आणि वेशभूषा यावर गुण देण्यात येईल. या स्पर्धेत प्रथम बक्षीस १५०० रुपये, द्वितीय १,००० रुपये आणि तृतीय बक्षीस ७०० रुपये दोनही गटांना दिले जातील. प्रकल्प अधिकारी म्हणून छाया राठोड (७५०७६३०१७०), अलका राऊत (९९२२६६१४८७), सुनीता भोयर (७२१८२४०४३९), निलिमा मंत्री (९४०३४५४६९७) काम पाहत आहे.