शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी ‘युफोरिया-१५’ चे आयोजन

By admin | Updated: January 25, 2015 23:28 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१५’ या चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१५’ या चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार उपस्थित राहणार आहे. उद्घाटन समारंभानंतर दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांच्या क्रीडा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. त्यानंतर कला प्रदर्शन, कवी संमेलन, वादविवाद स्पर्धा तसेच सायंकाळी नृत्य, नाट्य स्पर्धा आणि जेडीआयईटी रॉक बँड ‘द लॉस्ट ग्रॅव्हीटी’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी २८ जानेवारी रोजी दुपारी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, पालक सभा, नामांकित माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि महाविद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी नाट्य व नृत्य स्पर्धा, जेडीआयईटी अभि तक आणि रंगारंग फॅशन शो आदी कार्यक्रम आयोजित आहे. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठ परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून महाविद्यालयाची मान उंचावणारे विद्यार्थी, ‘सर्वोत्तम विद्यार्थी व सर्वोत्तम कर्मचारी’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर उपस्थित राहणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता नाटिका, नृत्य, सायंकाळी फिशपॉन्ड आणि आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या समारोपीय दिवशी ३० जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण, एसआरसी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व सायंकाळी मेकिंग आॅफ युफोरियाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६ वाजता ‘सिंफोनिया’ हा म्युझिक, डान्स आणि कॉमेडी शो आयोजित आहे. या मैफिलीत इंडियन आॅयडॉल फेम अमेय दाते, प्रसिद्ध गायिका अमृता नातू, एका पेक्षा एक व अप्सरा आली फेम नृत्यांगणा सुकन्या कलान, विनोदी अभिनेता शंतनू ठेंगळी सहभागी होणार आहे. यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हाटकर यांच्या मार्गदर्शनात युफोरिया संयोजक, विद्यार्थी सरचिटणीस, सांस्कृतिक सचिव आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहे. (नगर प्रतिनिधी)