शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

संघटित गुन्हेगारी ठेचून काढणार

By admin | Updated: May 11, 2017 01:01 IST

गेल्या काही वर्षात संघटित गुन्हेगारी छोट्या शहरांमध्येही बळावली.

अपर पोलीस अधीक्षक : अवैध धंद्यांवरही लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गेल्या काही वर्षात संघटित गुन्हेगारी छोट्या शहरांमध्येही बळावली. यवतमाळातही हा प्रकार चांगलाच रूजला आहे. त्यामुळे अवैध धंदे आणि संघटीत गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यवतमाळ येथे नव्यानेच रुजू झालेले अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. जाधव यांनी यवतमाळच्या अपर पोलीस अधीक्षकांचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा करतानाच त्यांच्या कार्याची रुपरेषा स्पष्ट केली. मूळ सातारा येथील असलेले जाधव यांनी यापूर्वी बीड, अकोला शहर, कोल्हापूर आणि अमरावती या जिल्ह्यांत काम केले आहे. अकोला शहर हे गँगवारसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सलाम गँगवर ३२ गुन्हे दाखल असून या गँगसह तेथील इतरही संघटित गुन्हेगारीवर प्रतिबंध घालण्यात त्यांनी बऱ्यापैकी यश मिळविले. त्यामुळे यवतमाळातही गँगवारसारख्या गुन्हेगारीवर आपण पूर्णपणे प्रतिबंध घालू, असे ते म्हणाले. इतर अवैध धंदे फोफावणार नाही याकडे लक्ष देऊ. शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहिल, यासाठी आपण प्रयत्न करू. मंगळसूत्र चोरी, बसस्थानकावरील चोऱ्या, घरफोड्या आदींवर आळा घालण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठीसुद्धा पोलिसांच्या विविध शाखांद्वारा विशेष प्रयत्न करणार असल्याचे अमरसिंह जाधव म्हणाले. जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जनतेची साथ आवश्यक असून त्यासाठी पोलिसांनी जनतेमध्ये मिसळून त्यांचा विश्वास संपादन करावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. या पत्रपरिषदेला पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर उपस्थित होते. सुसंवादासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण पोलीस आणि जनतेचे सबंध परस्पर विश्वासार्हतेचे निर्माण व्हावे, संवाद वाढावा यासाठी विद्यार्थी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. मुंबई पोलीस कायद्यानुसार आम्ही शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमच्या कार्यात सहभागी करून घेऊ शकतो. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे त्यांना या कामाची माहिती आवश्यक आहे. सोबतच पालक, शिक्षक आणि जनतेमध्येही पोलिसांप्रती विश्वास निर्माण होईल. महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांनी शहर व गावांमध्ये लोकांमध्ये मिसळून कॉर्नर मिटींग घ्याव्या, त्यामुळे महिलांमध्ये पोलिसांप्रती असलेली नकारात्मकता कमी होइल, यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव म्हणाले.