शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘डिंक्या’मुळे संत्रा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:18 IST

एकीकडे गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशीची वाताहत झालेली असताना दुसरीकडे संत्रा पिकांवर डिंक्या रोगाने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे.

ठळक मुद्देबागा वाळण्याचा धोका : गुलाबी बोंडअळीनंतर पुन्हा एक धक्का

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : एकीकडे गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशीची वाताहत झालेली असताना दुसरीकडे संत्रा पिकांवर डिंक्या रोगाने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये कमालीचे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.यावर्षी संत्राचे पीक पाहिजे तसे आलेले नाही. बहर मोठ्या प्रमाणात आला परंतु अनेक झाडांना फळधारणाच झालेली नाही. त्यातल्या त्यात डिंक्या रोगाने झाडेच पोखरायला सुरुवात केली आहे. बहुतांश फळ असलेली झाडेच डिंंक्या रोगाच्या आक्रमणाला बळी पडली आहे. त्यामुळे फळे मोठ्या प्रमाणात गळली. तर दुसरीकडे लागलेली फळे पूर्णत: भरलेली नाही. फळांमधील गोडवाही कमी झाल्याचे स्पष्ट होते.गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे बोंड वरुन चांगले दिसत असले तरी आतून संपूर्ण खराब केलेले असते. प्लॉटच्या-प्लॉट गुलाबी बोंडअळीमुळे नष्ट झाले आहे. तशीच स्थिती डिंक्या रोगामुळे संत्रा झाडाची तर होणार नाही ना, अशी भिती शेतकरी वर्गात आहे. हा रोग म्हणजे झाडांच्या बुंदाला छीद्र पडतात. या छिद्रातून चिकट द्रव्य बाहेर पडतो. झाडांची पाने सुकायला लागतात. झाड निस्तेज दिसते. त्यामुळे या रोगाला अटकाव करण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा शेतकरी वर्ग देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नयेयावर्षी डिंक्या रोगाने मोठे आक्रमण केलेले आहे. फळ आणि बार मोठ्या प्रमाणात गळाला. झाडेही निस्तेज पडायला लागली. उत्पन्नही घटले - चंद्रशेखर चांदोरे, शेतकरी, कळंबडिंक्या रोगाचा संसर्ग झाडाच्या खोडाला पाणी लागले तर होतो. हा रोग होऊच नये म्हणून अनेक उपाययोजना आहेत. परंतु शेतकरी त्यांची नियमित अंमलबजावणी करण्यामध्ये कमी पडतो. काही प्रमाणात दुर्लक्षही झाडांच्या मुळाशी येऊ शकते. शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता कृषी विभागाशी संपर्क साधावा आणि योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांनी दिली.