शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदाचे वेध

By admin | Updated: November 26, 2014 23:12 IST

काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्णत: उद्ध्वस्त करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाच्या आमदारांना आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. मात्र त्यासाठीही जोरदार रस्सीखेच सुरू असून नेमकी

‘गॉडफादर’मार्फत फिल्डींग : आर्णी-केळापूर आणि यवतमाळच्या आमदारात रस्सीखेच यवतमाळ : काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्णत: उद्ध्वस्त करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाच्या आमदारांना आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. मात्र त्यासाठीही जोरदार रस्सीखेच सुरू असून नेमकी कुणाला लॉटरी लागते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जात होता. कारण येथे शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार यांच्यासारखे दीर्घ अनुभवी नेते आहेत. गेल्या विधानसभेत काँग्रेसचे सात पैकी तब्बल पाच आमदार होते. भाजपाला काँग्रेसने जिल्ह्यातून विधानसभेत खातेही उघडू दिले नव्हते. मात्र पाचच वर्षात भाजपाने हीच स्थिती काँग्रेसवर आणली. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाचही आमदारांचा पराभव करून या जागा भाजपाने पटकाविल्या. भाजपच्या या नवनिर्वाचित आमदारांना मंत्रिमंडळाचे वेध लागले आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीत कुणालाही संधी मिळाली नाही. मात्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होत असल्याचे सांगण्यात येते. या विस्तारात आपल्याला संधी मिळावी म्हणून पाचही आमदारांनी आपल्या गॉडफादरमार्फत मोर्चेबांधणी चालविली आहे. यवतमाळचे भाजपाचे आमदार मदन येरावार यांची या विस्तारात मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात असला तरी त्यांच्या बोलण्यातील हूरहूरही लपून राहात नाही. कारण मदन येरावार यांना मंत्रिमंडळातील वर्णीसाठी स्पर्धक म्हणून आर्णी-केळापूरचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांचे तगडे आव्हान आहे. कारण मदन येरावार यांच्यावर गडकरी समर्थक म्हणून शिक्का लागला आहे. तर तोडसाम हे फडणवीस यांच्या ‘गुडबूक’मधील मानले जातात. तोडसाम यांच्या माध्यमातून आदिवासी-गोंड समाजाला मंत्रिमंडळात संधी मिळावी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर स्वत: दिल्लीतून मोर्चेबांधणी करीत असल्याचे सांगितले जाते. अहीर यांनी तोडसाम यांना तसा शब्दही दिला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यवतमाळ दौऱ्यात आमदार राजू तोडसाम यांची संपूर्णवेळ त्यांच्याशी असलेली जवळीक बरेच काही सांगून जाते. सलग आठ टर्म विधानसभा निवडणूक लढणाऱ्या आणि गेली कित्येक वर्ष मंत्री राहिलेल्या शिवाजीराव मोघे या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला पराभूत करून राजू तोडसाम मताधिक्याने निवडून आल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते ‘इम्प्रेस’ झाले आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील अन्य गडकरी समर्थकांऐवजी तोडसाम यांचा प्राधान्याने विचार केला जात असल्याची माहिती आहे. पांढरकवडा तालुक्यात भाजपाचे प्रचंड गट-तट असताना तीन वर्षांपूर्वी हंसराज अहीर यांनी तालुकाध्यक्षपदाची माळ राजू तोडसाम यांच्या गळ्यात घातली होती. तोडसाम यांनी गटा-तटाला एकत्र आणून पक्षबांधणी केली. विधानसभेच्या निकालाने त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामावरही शिक्कामोर्तब केले. तोडसाम यांच्या या अनेक ‘प्लस पॉर्इंट’मुळेच येरावार समर्थकांची हूरहूर वाढली आहे. उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्याकडेही पक्षात गडकरी समर्थक म्हणूनच पाहिले जाते. गडकरी-फडणवीस वाद पक्षात सर्वश्रृत आहे. या वादात येरावार, नजरधने हे भरडले जाण्याची दाट शक्यता आहे. आर्णी-केळापूर मतदारसंघावर गेली कित्येक वर्ष आदिवासीतील आंध समाजाचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी पहिल्यांदाच तोडसाम यांच्या माध्यमातून गोंड समाजाला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची संधी आहे. आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व द्यायचे असल्यानेच तोडसाम यांचा गांभीर्याने विचार केला जात असल्याचे सांगितले जाते. राळेगावचे आमदार प्रा. अशोक उईके आणि वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हेसुद्धा आपल्या परीने प्रयत्नरत आहेत. छुप्या फिल्डींगद्वारे त्यांनीही मदन येरावार यांच्यापुढे अप्रत्यक्ष आव्हान ठेवले आहे. जिल्ह्यातील भाजपाचे पाचही आमदार मंत्रीपदासाठी प्रयत्नरत असताना नेमके कुणाचे नशीब फळफळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)