शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

पालकमंत्र्यांच्या घरापुढे निदर्शने

By admin | Updated: April 8, 2017 00:07 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून पळवाट काढत महामार्गावरील दारू दुकाने वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासन महामार्ग अवर्गीकृत करीत आहे.

स्वामिनीचे आंदोलन : दारासमोर दारू बॉटलचे तोरण बांधण्याचा प्रयत्न यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून पळवाट काढत महामार्गावरील दारू दुकाने वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासन महामार्ग अवर्गीकृत करीत आहे. त्याचा निषेध करत शुक्रवारी दारूबंदी कार्यकर्त्यांनी थेट पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरासमोर निदर्शने करून दारूच्या बॉटलचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला. अखेर आंदोलक महेश पवारसह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून वातावरण शांत केले. स्वामिनी दारूमुक्त जिल्हा अभियानाच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वामिनीचे कार्यकर्ते पालकमंत्री मदन येरावार यांच्या दत्तचौक परिसरातील घरापुढे धडकले. अचानक मोठ्या प्रमाणात जमाव झाल्याने वडगाव रोड पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले. त्यावेळी स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार कार्यकर्त्यांसह पालकमंत्र्यांच्या निषेधाचे पत्रक त्यांच्या घरावर चिकटविण्याच्या प्रयत्नात होते. तसेच आंदोलकांनी दारूच्या बाटल्यांचे तोरुणही करून आणले होते. हे तोरण पालकमंत्र्यांच्या घराच्या गेटवर लावण्याचा आंदोलकांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मज्जाव करताच आंदोलकांनी चिडून पालकमंत्र्यांच्या घरापुढेच दारूच्या बाटल्या थडाथड फोडून संताप व्यक्त केला. यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेली दारू दुकाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु, महाराष्ट्र शासनाने १८ मार्च रोजी जीआर निर्गमित करून यवतमाळ शहरातून जाणारा राज्यमार्ग नगरपरिषदेकडे हस्तांतरित करून घेतला. यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांनीच प्रशासनाला झुकविल्याचा आरोप महेश पवार यांनी केला. पोलिसांनी स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, विश्वास निकम, मनिषा काटे, प्रशांत मस्के, राजू राऊत, मनोज राठोड, लता चौधरी, सुषमा गाढवे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, वडगाव रोडचे ठाणेदार देवीदास ढोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आंदोलकांना अक्षरश: फरफटत वाहनात कोंबून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी अटकेची कारवाई करून त्यांना न्यायालयापुढे हजर केले. नंतर त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी) सरकारचा डाव हाणून पाडण्याचा इशारा न्यायालयाचा आदेश असतानाही पालकमंत्र्यांनी राज्य मार्ग नगरपरिषदेच्या हद्दीत घेऊन यवतमाळातील दारू दुकाने वाचविली आहे. जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून आंदोलने करीत आहोत. तेच आमचे अंतिम ध्येय आहे. पण जिल्ह्याचे पालकच दारू दुकाने वाचवित असतील तर दारू बंदी कशी होणार? राज्यातील सर्वच राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग अवर्गीकृत करून दारू दुकाने वाचविण्याचा सरकारचा डाव आहे. तो आम्ही सफल होऊ देणार नाही, असे स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी सांगितले.