शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

शासकीय जलतरण तलावाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप

By admin | Updated: April 25, 2015 23:55 IST

शासकीय नियम डावलून आपल्या मर्जीतील वा विशिष्ट कंत्राटदारास समोर ठेऊन स्थानिक आझाद मैदानातील शासकीय जलतरण तलाव...

प्रक्रिया खोळंबली : नियम डावलल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, मर्जीतील लोकांना कंत्राट देण्यासाठी उठाठेव केल्याचा आरोपनीलेश भगत यवतमाळशासकीय नियम डावलून आपल्या मर्जीतील वा विशिष्ट कंत्राटदारास समोर ठेऊन स्थानिक आझाद मैदानातील शासकीय जलतरण तलाव कंत्राटी पद्धतीवर देण्याच्या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या निविदेवर आक्षेप दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची यासंदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रियाच खोळंबली आहे. स्थानिक आझाद मैदानातील शासकीय जलतरण तलाव जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलव्दारे संचालित केल्या जातो. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने फेब्रुवारी २०१५ मध्ये जिल्हा क्रीडा संकुल समितीने जलतरण तलाव, हॉटेल व जीम हॉल कंत्राटीपद्धतीने चालविण्याचा निर्णय घेतला. तशी निविदा ४ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली. १८ मार्चपर्यंत निविदा भरून सादर करावयाच्या होत्या. पुढे अंतिम तारखेत वाढ करून २५ मार्च करण्यात आली. शेवटच्या तारखेपर्यंत सहा निविदा प्रपत्रांची विक्री झाली. त्यापैकी केवळ तिघांनी निविदा भरून दिल्या. २६ मार्चला निविदा उघडण्याचे निश्चित होते, मात्र ‘मार्च एंडिंग’मुळे १ किंवा २ एप्रिलला निविदा उघडणार असल्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाने जाहीर केले. दरम्यान, निविदा अर्ज नेणारे मुकेश इंगोले यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने संपूर्ण निविदा प्रक्रिया शासकीय नियमाला डावलून प्रसिद्ध केल्याची तक्रार जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे केली. निविदेच्या अनेक अटी व शर्तीवर आक्षेप घेण्यात आले. क्रीडा कार्यालयाने मर्जीतील विशिष्ट कंत्राटदारास समोर ठेऊन निविदेच्या अटी व शर्ती तयार केल्या. जलतरण तलावाचे वार्षिक किमान भाडे सात लाख रुपये असे तीन वर्षांसाठी २१ लाख रुपये होत असूनही शासकीय नियमाप्रमाणे ई-निविदा का काढण्यात आली नाही, असा अक्षेप घेण्यात आला. निविदा अर्जातील अटी संदिग्ध आणि माहिती विसंगत असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. जलतरण तलाव चालविण्यासाठी जिल्ह्यातील कुणीही पात्र ठरणार नाही, हाच प्रयत्न क्रीडा कार्यालयाने अटी मांडताना केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संपूर्ण निविदा प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी लोकेश इंगोले यांनी केली आहे. नगरसेवकांनी घेतले होते निविदेवर आक्षेपदोन वर्षांपूर्वीच्या चुकांची पुनरावृत्तीफेब्रुवारी २०१३ मध्ये या तलावाचे लोकापर्ण झाले. अगदी सुरूवातीला या तलावाचे खासगीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी निविदाही मागविल्या. मात्र तांत्रिक बाब आणि मर्जीतील व्यक्तींनाच कंत्राट देण्याचा क्रीडा कार्यालयाचा हेतु असल्याचा आरोप करत काही नगरसेवकांनी निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतला. त्यानंतर निविदा मागविण्याचा दोनदा निर्णय रद्द करावा लागला. दोन वर्षानंतर क्रीडा कार्यालयाने त्याच चुकांची पुनरावृत्ती केल्याने यावर्षीसुद्धा निविदा प्रक्रियांवर आक्षेपाची नामुष्की पत्करावी लागली. शासकीय जलतरण तलावाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले आहे. यासंदर्भात एक-दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनात पुढील निर्णय घेण्यात येईल. - अविनाश पुंड, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी.