शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

‘मेडिकल’मध्ये ८११ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:37 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ८११ नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. अंध व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी निष्काम भावनेने नेत्रशस्त्रक्रिया करत असल्याचे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

ठळक मुद्देतात्याराव लहाने : आरोग्य शिबिरातून अंधांचा सन्मान, अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत चार दिवस शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ८११ नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. अंध व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी निष्काम भावनेने नेत्रशस्त्रक्रिया करत असल्याचे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारात हे शिबिर घेण्यात आले. यावेळी जे.जे. रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. रागिनी पारेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, नेत्रशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर पेंडके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीधर मोहोड, संतोष ढवळे, हरिहर लिंगनवार, नगरसेवक गजानन इंगोले उपस्थित होते.नेत्रशस्त्रक्रिया शिबिरात दोन टप्प्यांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. तपासणीला आलेल्या रुग्णांपैकी १५० जण पूर्णत: आंधळे होते. त्यांना शस्त्रक्रियेमुळे नवी दृष्टी मिळाली आहे. अनेक रुग्णांना मधुमेह व रक्तदाब असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकली नाही, अशा रुग्णांसाठी पुन्हा शिबिर आयोजित करण्याचेही सांगण्यात आले. रुग्णांनी डोळ्यात मोतीबिंदू झाल्यानंतर तो पीकेपर्यंत वाट पाहू नये, असा सल्लाही डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला. चार दिवसाच्या शिबिरात ८११ रुग्णांना नवी दृष्टी मिळाल्याचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी सांगितले. यावेळी मुंबई येथील नेत्ररोग तज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. माँ आरोग्य सेवा समितीच्यावतीने रुग्णांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. सरफराज सौदागर यांनी केले. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची तपासणी जानेवारी महिन्यात पुन्हा करण्यात येऊन त्यांना औषधी दिली जाणार आहे. यशस्वीतेसाठी घनश्याम नगराळे, शेखर राठोड, विकास क्षीरसागर, अमित मेहरे, राजू गिरी, पवन शेंद्रे, जयपाल पवार, राजू ठाकरे, अमोल राठोड यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयYavatmalयवतमाळ