शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पाथरवटांचे जीणे उघड्यावरच

By admin | Updated: August 23, 2014 02:11 IST

रस्त्याच्या कडेला, मिळेल तेवढ्या जागेत, चिखलाच्या दलदलीत आणि गांजर गवताच्या आश्रयाने कापडाचे पाल ठोकून गेल्या कित्येक वर्षांपासून पाथरवट समाजाचे कुटुंब राहत आहे.

 प्रकाश सातघरे दिग्रसरस्त्याच्या कडेला, मिळेल तेवढ्या जागेत, चिखलाच्या दलदलीत आणि गांजर गवताच्या आश्रयाने कापडाचे पाल ठोकून गेल्या कित्येक वर्षांपासून पाथरवट समाजाचे कुटुंब राहत आहे. यंत्र युगाच्या प्रगतीने जाते, पाटे, उखळ, खलबत्ते घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि त्यांना उघड्यावर उपेक्षिताचे जीणं नशिबी आहे.दिग्रस शहरातील मानोरा चौकातून बसस्थानकाकडे जाताना एका रांगेत रंगीबेरंगी कापडाचे पाल दिसतात. त्यासमोर दगडातून जाते, पाटे, उखळ, खलबत्ते, नंदी बैल, महादेवाची पिंड आदी आकार देताना दिसतात. मोकळ्या मैदानात ठोकलेल्या या पालात राहतात पाथरवट समाजाची कुटुंब. १५ पालात तब्बल १४० सदस्य येथे राहतात. नांदेड जिल्ह्यातील भोकर या गावचे पाथरवट (वडार) समाजाची मंडळी गेल्या १० वर्षांपासून येथे मुक्कामी आहे. लहान मोठे सदस्य मिळून १३० ते १४० मंडळी येथे राहत आहे. दोन लाकडे उभे करून त्यावर कापड टाकले की त्यांचे घर तयार होते. माणसाचे हातपाय लांबविताना वीतभर जागाही शिल्लक राहत नाही. एवढे छोटेसे घर. एवढ्याच जागेत पाच ते सहा कुटुंबातील सदस्य दाटीवाटीने राहतात. याच जागेत लग्न समारंभ आणि सणही साजरे होतात. पंखा नाही, लाईट नाही की मनोरंजनासाठी टीव्ही नाही, मच्छरांच्या तावडीत, पथदिव्यांच्या मंद प्रकाशात ही मंडळी वर्षानुवर्ष राहत आहे. दिवसभर दगडाला आकार देऊन घाम गाळतात. यापासून मिळणाऱ्या परिश्रमावर त्यांचा चरितार्थ चालतो. या कुटुंबाकडे शेती नाही, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था नाही अशा स्थितीत आज ही मंडळी जीवन जगत आहे. माणुसकीचे धडे सांगणाऱ्या कुणी एखाद्या माणसाने माणुसकी दाखवून त्यांचे जीवन इतरांप्रमाणे सुकर व्हावे, किमान अन्न-वस्त्र-निवारा या गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी प्रयत्न केले नाही. यंत्र विभाग सर्व काही रेडिमेड मिळत असल्याने कुणी जाते, पाटे, उखळ घेण्यासाठी येत नाही. वर्षातील काही दिवस तर एक छदामही त्यांच्या हाती पडत नाही. परंतु आपला हा परंपरागत व्यवसाय मात्र त्यांनी नेटाने सुरू ठेवला आहे. जणू त्यांचं जीवन जात्याखाली भरडण, पाट्याखाली चिरडण आणि उखळात कुंटत राहणं असेच झाले आहे. दगडाला देवपण देणाऱ्या या माणसाच्या जीवनाला कधी आकार मिळेल हे मात्र कुणीही सांगत नाही.