शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात केवळ साडेतीन हजार किलोमीटरचे महामार्ग बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:27 IST

दरवर्षी हजारो किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधणाऱ्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने यावर्षी (२०१९-२०) देशभरात केवळ साडेतीन हजार किलोमीटरचे महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनिधीचे नियोजनआधी हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दरवर्षी हजारो किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधणाऱ्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने यावर्षी (२०१९-२०) देशभरात केवळ साडेतीन हजार किलोमीटरचे महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हाती घेतलेले प्रकल्प आधी पूर्ण करणे व निधीचे नियोजन करणे हा यामागील उद्देश आहे.नॅशनल हायवे ऑथिरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशभरात हजारो किलोमीटरचे रस्ते, पूल, उड्डाण पूल, एक्सप्रेस-वे बांधले जातात. गेल्या काही वर्षांपासून हजारो कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात आले. परंतु अनेक प्रकल्प कुठे निधीमुळे तर कुठे तांत्रिक अडचणीमुळे मंदगतीने सुरू आहेत. तर दुसरीकडे नवनवीन महामार्ग प्रस्तावित केले जात आहे. त्यातूनच निधीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर तोडगा म्हणून भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने निधीचे नियोजन करण्याचे ठरविले. याअंतर्गत देशभरात सुरू असलेले प्रकल्प आधी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नव्या प्रस्तावांना तूर्त ब्रेक लावण्यात आला. अत्यावश्यक असलेले देशभरातील केवळ साडेतीन हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग या वर्षभरात बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.निधीच्या टंचाईमुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा प्राधान्यक्रम ठरविताना लघु, मध्यम व उच्च अशी वर्गवारी करण्यात आली. मात्र उच्च वर्गवारीतील कामातही हजारो कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्याने उच्च व अत्यावश्यक बांधकामाचे उच्च-१, उच्च-२ असे दोन गट करण्यात आले. सध्या उच्च-१ गटातील राष्ट्रीय महामार्गांवर भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात महाराष्ट्रातील अनेक मार्गांचा समावेश आहे.नीती आयोगाने महामार्ग नाकारलामहाराष्ट्रात अनेक राज्य मार्गांना महामार्गाचा दर्जा देण्याचे प्रस्तावित आहे. परंतु निधीची अडचण आहे. धारणी (जि. अमरावती) ते करंजी (जि. यवतमाळ) या साडेतीनशे किलोमीटरच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा प्रस्तावित होता. परंतु केंद्र शासनाच्या नीती आयोगाने एवढा निधी देणे शक्य नसल्याचे सांगत काही महिन्यांपूर्वी महामार्गाचा हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतर राज्य शासनाच्या निधीतून आहे त्या स्थितीत या राज्य मार्गाला ठिकठाक करण्याचे प्रस्तावित आहे. अशाच पद्धतीने अनेक राष्ट्रीय महामार्गांचे प्रस्ताव सध्या थंडबस्त्यात टाकण्यात आले आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग