शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
6
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
7
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
8
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
9
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
10
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
11
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
12
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
13
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
14
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
15
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
16
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
17
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
18
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणं; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
19
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
20
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात केवळ २४ टक्के खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:06 IST

राज्यातील दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३५ लाख हेक्टरवरच शेतकऱ्यांना पेरण्या क रता आल्या. या ठिकाणी केवळ २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली . यामुळे राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.

ठळक मुद्देगुजरातच्या वादळाने गणित बिघडविलेकृत्रिम पावसासाठी आता ढगांचा शोध

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुजरातच्या वादळाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित बिघडवले. मुंबई, पुणे, नाशिक भागावरच कमी दाबाचा पट्टा तयार झाला. यामुळे इतर भागात पाहिजे तसा पाऊस झाला नाही. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७१ तालुक्यांची स्थिती चिंताजनक आहे.राज्यातील दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३५ लाख हेक्टरवरच शेतकऱ्यांना पेरण्या क रता आल्या. या ठिकाणी केवळ २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली . यामुळे राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. यावर उपाय म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. याकरिता लागणारे ढग यंत्रणा सज्ज असलेल्या भागात दिसत नाही. यामुळे तूर्त कृत्रिम पावसाचा प्रयोगही थांबला आहे.संपूर्ण राज्यात एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीखाली येते. यावर्षीच्या खरीप हंगामात ५ जुलैपर्यंत राज्यात ३५ लाख ६७ हजार ९५६ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पेरणी यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची नोंद कृषी विभागाने केली. या ठिकाणी लागवड क्षेत्राच्या ६९ टक्के भागात पेरणी आटोपली आहे.इतर जिल्ह्यात स्थिती चिंताजनक आहे. अकोल्यात दोन टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बुलडाणा ३१ टक्के, वाशिम सात टक्के, अमरावती १४, वर्धा ३५, नागपूर ३२, भंडारा दोन टक्के, चंद्रपूर २५, गडचिरोली चार टक्के, गोंदिया एक टक्का, लातूर नऊ टक्के, उसमानाबाद १२ टक्के, नांदेड २५ टक्के, परभणी ३१ टक्के, हिंगोली ११ टक्के इतकी पेरणीची नोंद झाली आहे.काही भागात जोरदार पाऊस सतत कोसळला. यामुळे या क्षेत्रातही पेरण्या करता आल्या नाही. यातून संपूर्ण लागवडक्षेत्र धोक्यात आले. राज्यात ज्या क्षेत्रात पेरणी झाली, त्यातील निम्मे क्षेत्र कपाशीचे आहे. १९ लाख १७ हजार ३५८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तृणधान्य चार लाख ५४ हजार ९४ हेक्टर, कडधान्य तीन लाख ८१ हजार ४८० हेक्टर, तेलबिया आठ लाख सात हजार ११६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सात हजार ९०८ हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे.कृत्रिम पावसासाठी ढगांचा शोधराज्यातील ७१ तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी पावसाची नितांत गरज आहे. यावर मात करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे. त्याकरिता ३० कोटींची तरतूद करण्यात आली. यंत्रणाही सज्ज आहे. मात्र मराठवाड्यातील या भागावरून पावसासाठी पोषक ढगच जात नाही. यामुळे कृत्रिम पवसाचा प्रयोग थांबला आहे. या प्रयोगासाठी औरंगाबादमध्ये सिबँड टॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात आले आहे. यापूर्वी २००३ मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग राज्यात करण्यात आला होता.विभागनिहाय पेरणी क्षेत्रसर्वात कमी पेरणी कोकणात दोन टक्के झाली. नाशिक विभागातही अशीच स्थिती आहे. २७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभाग चार टक्के, कोल्हापूर विभाग २४, औरंगाबाद विभाग ३३, लातूर विभाग १९, अमरावती विभाग ३० तर नागपूर विभागात २२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.राज्यातील काही भागात पावसाची स्थिती विदारक आहे. अशा भागावर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र यासाठी आवश्यक असणारे ढग या ठिकाणावरून जात नाही. पावसासाठी आवश्यक असणाऱ्या ढगांचा यंत्रणेला शोध आहे. ही परिस्थिती तयार होताच कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे.- डॉ.अनिल बोंडेकृषिमंत्री

टॅग्स :agricultureशेती