शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

राज्यात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 10:13 IST

राज्यात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस असल्याने जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाचा ताण वाढता असल्याने पोलिसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देदेशात सर्वात कमी महाराष्टत

राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस असल्याने जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाचा ताण वाढता असल्याने पोलिसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने राज्यातील पोलीस शिपाई ते निरीक्षकांच्या वेतन पुनर्रचनेचा अहवाल नुकताच राज्याच्या पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला. त्यात ही धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. जनतेच्या जीवाची, मालमत्तेची सुरक्षा करणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असताना प्रत्यक्षात लोकसंख्या आणि पोलिसांची संख्या याची आकडेवारी तपासल्यास प्रचंड तफावत दृष्टीस पडते. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्टतील पोलिसांच्या उपलब्धतेचा हा आकडा देशात सर्वात कमी आहे. विशेष असे, भौगोलिक क्षेत्रफळानुसार महाराष्ट हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. तरीही येथे पोलिसांची वानवा आहे.उपलब्ध पोलिसांवर नैसर्गिक संकटे, दहशतवादी हल्ले, नक्षलवाद, जातीय दंगली, शेतकऱ्यांची आंदोलने, गंभीर गुन्ह्यांचा तपास, शिक्षेच्या दृष्टीने साक्षपुराव्यांची जुळवाजुळव, आरोपींची धरपकड, निवडणूक बंदोबस्त, महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याचा बंदोबस्त, वाहतूक नियमन, २४ तास पोलिसिंग, रात्रगस्त, गुन्हेगारांवरील वचक, डिटेक्शन, कायदा व सुव्यवस्था राखणे, सण-उत्सव अशा विविध जबाबदाऱ्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पोलीस मनुष्यबळ अगदीच तुटपुंजे ठरत आहेत. सलग ड्युटी, सततचा बंदोबस्त,आठवडी रजाही मिळत नाही, बंदोबस्ताच्या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

अन्य राज्यात उपलब्ध पोलीस बळ( एक लाख लोकसंख्येमागे )महाराष्ट - १५३, मणिपूर - ९८४, नागालॅन्ड - ९३९, मिझोराम - ९१५, अरुणाचल प्रदेश - ८८०, सिक्कीम - ७५८, अंदमान-निकोबार - ७२५, त्रिपुरा - ६३७, मेघालय - ४५७, लक्षद्वीप - ३९१, दिल्ली - ३८३, चंदीगड - ३६२, गोवा - ३५४.

टॅग्स :PoliceपोलिसGovernmentसरकार