शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

शिक्षक भरतीमधील ऑनलाईन भरतीप्रक्रिया ऑफलाईनपेक्षाही धिमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 13:22 IST

शिक्षक भरतीमधील आर्थिक देवाणघेवाण थांबवून पारदर्शक आणि त्वरेने भरतीप्रक्रिया करण्यासाठी ऑनलाईन पद्धती अवलंबण्यात आली. मात्र ऑनलाईन प्रक्रिया तब्बल दीड वर्षांपासून रेंगाळलेली आहे.

ठळक मुद्देजाहिराती पहा आणि थंड बसा भावी शिक्षकांची थट्टा 

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षक भरतीमधील आर्थिक देवाणघेवाण थांबवून पारदर्शक आणि त्वरेने भरतीप्रक्रिया करण्यासाठी ऑनलाईन पद्धती अवलंबण्यात आली. मात्र ऑनलाईन प्रक्रिया तब्बल दीड वर्षांपासून रेंगाळलेली आहे. पवित्र पोर्टलवर केवळ रिक्त पदांच्या जाहिराती पहा आणि थंड बसा अशा अवस्थेत शासनाने बेरोजगारांना अधांतरी सोडले आहे.तब्बल आठ वर्षांपासून राज्यात शिक्षक भरतीच झाली नाही. त्यामुळे लाखो डीएड, बीएडधारक बेरोजगार आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसच्या काळात शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण होते, असे सांगत युती शासनाने ऑनलाईन शिक्षक भरतीचा निर्णय घेतला. डिसेंबर २०१७ मध्ये त्यासाठी अभियोग्यता चाचणी घेतली. दोन लाख बेरोजगारांनी या चाचणीमध्ये स्वत:ची पात्रता सिद्ध केली. मात्र आता दीड वर्ष लोटल्यावरही युती शासनाला भरतीप्रक्रिया पूर्णत्वास नेता आलेली नाही.शिक्षण संस्था चालक कोर्टात गेल्यामुळे प्रक्रियेला विलंब झाल्याचे तुणतुणे अनेक दिवस शिक्षण मंत्र्यांनी वाजविले. मात्र कोर्टाचा निकाल लागून दोन महिने लोटले तरीही शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल पुढे सरकायला तयार नाही. शासनाने मोठा गाजावाजा करुन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दहा हजार जागा भरण्याची घोषणा केली. आता पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिरातीही प्रदर्शित केल्या. मात्र दोन महिन्यांपासून बेरोजगार तरुण केवळ या जाहिराती बघणे आणि डाऊनलोड करणे एवढेच काम करीत आहे. प्रत्यक्षात रिक्त पदांचा प्राधान्यक्रम भरणे, नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करणे या प्रक्रिया शासनाने अद्यापही सुरू केलेल्या नाही. आता तर औरंगाबाद खंडपीठात याचिका प्रलंबित असल्याचा बहाणा पुढे करून प्रक्रिया आणखी लांबविण्याचे संकेत शासनाने दिले आहे.रिक्त पदांची सरकारलाच माहिती नाहीशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिक्षकांच्या दहा हजार रिक्त जागा पवित्र पोर्टलद्वारे भरण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात पोर्टलवर आज रोजी सुमारे १२ हजार रिक्त जागा अपलोड झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षण संस्थांमध्ये किती जागा रिक्त आहेत, याची मंत्र्यांनाच माहिती नसल्याचे स्पष्ट होते. प्रारंभी शिक्षण संस्थांमध्येही अभियोग्यता चाचणीतील गुणानुसारच शिक्षक भरती जाहीर करण्यात आली. नंतर संस्था चालकांनी कोर्टातून हा निर्णय बदलून घेतला. तर आता शासनाने मनधरणी करून १३ शिक्षण संस्थांना अभियोग्यता गुणानुसारच भरती करण्यास राजी केले आहे. मग काही संस्थांना एक नियम आणि बहुतांश संस्थांना वेगळा नियम का? असा प्रश्न बेरोजगारांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र