शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ऑनलाइन लूट सुरुच; आता किराणा व्यापाऱ्याचे एक लाख ८५ हजार उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2022 05:00 IST

मयूर इसरानी रा. धामणगाव रोड यांचे स्टेट बॅंक चौक परिसरात किराणा दुकान आहे. इसरानी यांनी ऑनलाईन खरेदी केली. त्यासाठी त्याचा पत्ता बदलविण्यासाठी गुगल पेवरून कस्टमर केअरच्या सांगण्यावरून पाच रुपये सेंड केले. पैसे सेंड करताच ठगाने इसरानी यांच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन त्यांच्या तीन बॅंकेतील खात्यातून एक लाख ८५ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. फसवणुकीचे लक्षात येताच इसरानी यांनी पोलीस ठाणे गाठले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात सातत्याने ऑनलाइन खरेदीच्या व्यवहारात बॅंक खात्यातून पैसे उडविले जात आहे. मोबाईलचा ॲक्सेस घेऊन ठगबाजांकडून पैसे काढून घेतले जातात. अशा सहा घटना घडल्या. यातून १३ लाख १६ हजार रुपयांची रोख उडविली. शनिवारी किराणा व्यावसायिकाला ऑनलाइन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले. त्यांनी गुगल पेवरून ५ रुपये सेंड केले. त्यांच्या तीन बॅंक खात्यांतून  १ लाख ८५ हजार ठगांनी दुसऱ्याच मिनिटाला काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यापाऱ्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. मयूर इसरानी रा. धामणगाव रोड यांचे स्टेट बॅंक चौक परिसरात किराणा दुकान आहे. इसरानी यांनी ऑनलाईन खरेदी केली. त्यासाठी त्याचा पत्ता बदलविण्यासाठी गुगल पेवरून कस्टमर केअरच्या सांगण्यावरून पाच रुपये सेंड केले. पैसे सेंड करताच ठगाने इसरानी यांच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन त्यांच्या तीन बॅंकेतील खात्यातून एक लाख ८५ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. फसवणुकीचे लक्षात येताच इसरानी यांनी पोलीस ठाणे गाठले. मागील आठवडाभरातील ही फसवणुकीची सातवी घटना आहे. कस्टमर केअर सोबत संपर्क करून फसवणूक होत आहे. या गुन्ह्यांचा तपास सायबर सेलकडे दिला आहे. 

गुगलवर सर्च केलेला नंबरच ठरतोय धोकादायक - ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या साईट सक्रिय आहेत. बहुतांश जण याचा वापर करून दैनंदिन वापराच्या वस्तूंची खरेदी करतात. खास करून महिला यात पुढे आहेत. याशिवाय व्यापाऱ्यांकडूनही ऑनलाईन व्यवहार केला जात आहे. या व्यवहारामध्ये अडचण आल्यास कस्टमर केअरला संपर्क करतात.  - कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक माहीत नसल्याने त्या-त्या वेबसाईटचे नाव टाकून त्याचा शोध गुगलवर घेतला जातो. गुगल हे माहितीची महाजाल आहे. त्याठिकाणी असणारी प्रत्येकच माहिती खरी असेल, हे सांगता येत नाही. ठगबाजांनी आता अनेक नामांकित कंपन्यांचे कस्टमर केअर म्हणून स्वत:चे नंबर अपलोड केले आहेत. हे ठगबाज ग्राहकांना हेरुन ऑनलाईन व्यवहारात त्यांचा मोबाईल ॲक्सेस घेऊन बॅंक खात्यातून पैसे उडवतात.

 

टॅग्स :onlineऑनलाइनcyber crimeसायबर क्राइम