शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

‘डीएचओ’कडून एकतर्फी कारवाई

By admin | Updated: February 7, 2016 00:40 IST

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर व्देष भावनेतून तसेच एकतर्फी कारवाई केली जात आहे.

उपसंचालकांना निवेदन : ‘मॅग्मो’ संघटनेने केला पक्षपातीपणाचा आरोप यवतमाळ : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर व्देष भावनेतून तसेच एकतर्फी कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र राज्यपत्रित वैद्यकीय अधिकारी गट व संघटनेने (मॅग्मो) हा आरोप केला आहे. यासंदर्भात आरोग्य उपसंचालक अकोला यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांवरील कारवाई १० दिवसात मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. २८ मार्च २०१२ च्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वैद्यकीय आधिकाऱ्यांवर कारवाईचे अधिकार नाही. केवळ कारवाई प्रस्तावित करता येते. कुठल्याही वैद्यकीय अधिकाऱ्याविषयी तक्रार असल्यास संबंधिताला कारणे दाखवा नोटीस देऊन सात दिवसात स्पष्टीकरण मागितले जाते. चौकशीअंती दोषाच्या गंभीरतेनुसार कारवाईचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्यानंतरच कारवाई अपेक्षित असते. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड यांनी केवळ आकसापोटी कारवाईचा सपाटा लावला आहे. शासन निर्णय, अधिनियम आणि नियम डावलून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील कारवाई १० दिवसात मागे न घेतल्यास संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. निवेदन सादर करताना संघटनेचे अध्यक्ष डॉ. धर्मेश चव्हाण, कार्याध्यक्ष डॉ. किशोर कोषटवार, सरचिटणीस डॉ. संजय मुरमुरे, कार्यकारी सचिव डॉ. महेश मनवर, कार्यकारी अध्यक्ष डॉ. मधुकर मडावी, चिटणीस डॉ. जब्बार पठाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)