शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून 'वसुली भाई'लाच लुटले; वडकी पोलिसांची कारवाई

By विलास गावंडे | Updated: October 7, 2023 20:44 IST

कंपनीने काढलेल्या जुन्या कर्मचाऱ्यासह तिघांना अटक

वडकी (यवतमाळ) : चाकूचा धाक दाखवून फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याचे एक लाख ९० हजार रुपये लुटणाऱ्या चार जणांना काही तासांत पकडण्यात वडकी पोलिसांना यश आले. सोनुर्ली ते सावरखेडा मार्गावर ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली होती. चोरट्यांकडून एक लाख रुपये रोख आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुथ्थूट कंपनीने काढून टाकलेल्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

पांढरकवडा येथील मुथ्थूट मायक्रोफिन लिमिटेडचे वसुली अधिकारी विकास बाबाराव दवणे (२५, रा. पांढरकवडा) यांना लुटण्यात आले होते. सावरखेडा, वरध भागातून वसुली करून ते सावरखेडावरून पांढरकवड्यासाठी दुचाकीने निघाले होते. दोन युवकांनी त्यांना थांबविले. मागाहून दोघे जण आले. त्यांनी चाकू दाखवून या वसुली अधिकाऱ्याजवळील बॅग हिसकावली आणि पळून गेले. सावरखेडा गावात जाऊन त्यांनी आपबिती सांगितली. तेथील नागरिकांनी वडकी पोलिसांशी संपर्क केला.पोलिस घटनास्थळावर पोहोचले. विकास दवणे यांच्याकडून घटनाक्रम जाणून घेत तपास सुरू केला. वडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांनी तपासाचे चक्र फिरवून पोलिस शिपाई विलास जाधव, सचिन नेवारे, विनोद नागरगोजे आदींनी तपास सुरू करून मुथ्थूट मायक्रोफिन लिमिटेडचा कामावरून काढलेला वसुली अधिकारी ओमशिवा विश्वास शिंदे (२२, रा. उत्तरवाढोणा, ता. नेर) याला त्याच्या गावातून रात्री ताब्यात घेतले. शिवाय रोहित बबलु गोंधळे (२२), राहुल हेमंत चावरे (२१), विशाल हुकूमचंद चावरे (२२) (सर्व रा. सेवानगर, यवतमाळ) यांना पकडले. त्यांच्याकडून रोख एक लाख रुपये आणि क्रमांक नसलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या. पुढील तपास वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी