शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत मिळाले एक लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या मुभा देण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांत आंनद आणि उत्साहाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देवणी एसटी आगार : प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद, एसटीच्या निर्जंतुकीकरणावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या दोन दिवसांत वणी आगाराला प्रवासी वाहतुकीतून एक लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून तब्बल ११३ दिवस बंद असलेली बाह्यजिल्हा बससेवा गुरूवारपासून पूर्ववत सुरू झाली. त्याला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या मुभा देण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांत आंनद आणि उत्साहाचे वातावरण आहे.गुरूवारी पहिल्या दिवशी वणी एस.टी.आगाराने ४० फेऱ्यांचे नियोजन केले. प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी सर्व बसेस स्वच्छ धुवून सॅनीटाईज करण्यात आल्या. सकाळी ९ वाजता पहिली बस चंद्रपुरसाठी सोडण्यात आली. सोबतच नागपूर, यवतमाळ, वर्धासाठीही बसेस सोडण्यात आल्या. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी नागपूर, चंद्रपूर, वरोरा, यवतमाळ या मार्गावर ४३६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून जवळपास ५० हजार रूपये उत्पन्न आगाराला मिळाले.कोरोनातही लालपरीला येणार सुगीचे दिवसशासनाने खासगी वाहनाने बाह्य जिल्हा प्रवासासाठी ई-पास बंधनकारक केली आहे. ई-पास मिळविण्यासाठी बºयाच प्रक्रियेतून जावे लागते. मात्र एस.टी.साठी ही अट शिथिल करण्यात आल्याने प्रवाशांना बसमधून ई-पासशिवाय कुठेही जाता येणार आहे. ही बाब जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची झाल्याने आता प्रवासी एस.टी.कडे वळणार आहेत. त्यातून एस.टी.उत्पन्न वाढणार असल्याने एस.टी.ला सुगीचे दिवस येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आगाराकडून सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे एस.टी.आगार प्रमुख सुमेध टिपले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :state transportएसटी