शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

१३ वर्षांत पाण्यासाठी मोजले एक कोटी

By admin | Updated: March 22, 2017 00:11 IST

शहरापासून वाहणारी जीवनदायीनी निर्गुडा नदी ही संपूर्ण वणी शहराची तहान भागवत आहे.

वणी नगरपालिका : नवरगाव धरणात ३२.३६ टक्के जलसाठा, पाणी टंचाईचे सावट आसिफ शेख  वणी शहरापासून वाहणारी जीवनदायीनी निर्गुडा नदी ही संपूर्ण वणी शहराची तहान भागवत आहे. तालुक्यात कोळसा खाणीची संख्या वाढल्याने पाण्याचे अनेक नैैसर्गिक झरे तुटले आहेत. २००४ पासून या नदीला जीवदान देण्याकरिता नवरगाव धरणावर अवलंबून राहावे लागत आहे. या धरणातून पाणी घेण्यासाठी वणी नगरपालिकेने पाण्यासाठी गेल्या १३ वर्षांत तब्बल एक कोटी रुपये खर्च केलेत. आता या धरणात केवळ ३२.३६ टक्के जलासाठा शिल्लक असून चार महिने नगरपरिषदेने योग्य नियोजन केले, तरच पाणी टंचाईवर मात करता येणार आहे. वणी शहराची लोकसंख्या ६२ हजार असून हे शहर ‘ब’ गटात मोडते. शहराची पाणी पुरवठा योजना १९५८ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हापासून निर्गुडा नदीच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा सुरू आहे. २००५ पूर्वीसुद्धा भर उन्हाळ्यात या नदीने दगा दिला नव्हता. मात्र कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण सुरू झाल्याने या नदीचा कृत्रिम पाणी पुरवठा बंद झाला. डिसेंंबर ते जानेवारी महिन्यापासून या नदीचा पाणी प्रवाह बंद पडतो. त्यामुळे शहराला पाणी टंचाई जाणवते. शहरात सहा लाख ७५ हजार लिटर व ११ लाख २५ हजार ३०० लीटर मर्यादा असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच २५ ट्युबवेल असून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु निगुर्डा नदीचा प्रवाह मध्येच बंद पडल्याने धरणातून पाणी आरक्षित करून वणीकरांची तहान भागविली जात आहे. वणी नगरपरिषदेने २.०० दलघमी, मारेगाव ०.६० दलघमी व जीवन प्राधिकरण ग्रामीण विभागाने ०.५० दलघमी पाणी पुरवठा आरक्षित केला आहे. वणी नगरपरिषदेने मागील वर्षी ४.७० दलघमी जलसाठा आरक्षित केला होता. त्यासाठी १० लाख ८० हजार रूपये पाण्याचे जमा केले होते. नगरपरिषदेकडे थकबाकी नसल्यामुळे पाण्याची मागणी वाढल्यास यावर्षीसुद्धा पुन्हा जास्त पाणी आरक्षित करू शकतात. नगरपरिषदेने २००४ पासून नवरगाव धरणाला एक कोटी रूपये दिले आहे. मागीलवर्षी ५८ तासांत पाणी नवरगाव धरणातून वणीपर्यंत पोहोचत होते. परंतु यावर्षी वातावरणात ओलावा असल्याने ३० तासात पाणी वणीपर्यंत पोहोचणार असल्याचे समजते. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान जादा भडकल्यास प्रकल्पातील पाण्याचे ७५ टक्के एम.एम.म्हणजे तीन दशलक्ष घनमीटर एवढे बाष्पीभवन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जलसाठा कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. नवरगाव धरण बनले वणी शहराची गरज नवरगाव धरण हे मारेगावची तहान भागविण्याकरिता प्रकल्प उभारला आहे. परंतु तो वणी शहराची गरज बनला आहे. नगरपरिषदेने कायमस्वरूपी पाणी योजनेसंदर्भात काय धोरण आहे, हे अद्यापही स्पष्ट केले नाही. नवरगाव धरणाचे पाणी आरक्षीत करून आपले काम तात्पूरते चालविण्यात येत आहे. नवरगाव धरणातून पाणी सोडले, तर वणीपर्यंत पाणी येताना मोठ्या प्रमाणात बाष्पिभवन होते. त्यासाठी २५ किलोमीटरची पाईपलाईन योजना टाकणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी वणीकरांची अपेक्षा आहे.