शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे दीड तास तांडव

By admin | Updated: June 15, 2017 01:01 IST

शहरात मंगळवारी रात्री अवघ्या दीड तासात ९६ मिमी पाऊस कोसळल्याने सर्वांचीच दाणादाण उडाली.

पुसदमध्ये ९६ मिमी : घरात पाणी, वृक्ष उन्मळले, भिंत कोसळली लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : शहरात मंगळवारी रात्री अवघ्या दीड तासात ९६ मिमी पाऊस कोसळल्याने सर्वांचीच दाणादाण उडाली. या पावसात एसटी आगाराची सुरक्षा भिंत कोसळली असून वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठाही खंडित झाला होता. सखल भागातील अनेक घरात पाणी शिरले असून रामनगरमध्ये रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. या पावसात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. पुसद शहरात मंगळवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता अवघ्या दीड तासात पावसाने कहर केला. दहा वर्षात पहिल्यांदाच दीड तासात ९६ मिमी पावसाची नोंद झाली. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी दुकानातही पाणी शिरल्याने चांगलीच तारांबळ उडाली. बाजार समितीच्या व्यापार संकुलातील बजाज ट्रेडर्स, गाजीयानी ट्रेडर्स, संजय सायकल स्टोअर्स, पद्मावार यांचे दुकान, बापुराव भगत यांच्या कापड दुकानात दोन ते तीन फूट पाणी साचले होते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. खरेदी विक्री संघाच्या व्यापार संकुलातील आशीष बुक डेपोत पाणी शिरल्याने तळे साचले होते. रात्री १ वाजता दुकान संचालकांनी पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वीजपुरवठा खंडित झाल्याने शक्य झाले नाही. शिवाजी वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, तुकाराम बापू वॉर्ड, वसंतनगर, सुभाष वॉर्ड, गढी वॉर्ड यासह अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले. तुकाराम बापू वॉर्डातील एका घरासमोर झाड उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. पुसद आगाराची सुरक्षा भिंत कोसळली. त्यामुळे तेथे दगडांचा खच पडला होता. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून वीज तारांवर पडल्याने शहराचा वीज पुरवठा बुधवारी पूर्णत: बंद होता. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. येथील तलाव ले-आऊटमधील वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयासमोरील मैदानाला अक्षरश: तलावाचे स्वरूप आले होते. मान्सूनपूर्व कामाकडे दुर्लक्ष पुसद नगरपरिषदेने मान्सूनपूर्व कामाकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी रात्री नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. नाल्यातील पाणी रस्त्यावर येत असून सुभाष चौक व इतर वॉर्डातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मान्सूनपूर्व सफाई वरवर करण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे नागरिक सांगत होते. शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता विभाग कमी पडल्याचेही दिसून आले. मोठ्या प्रमाणात नालीतील घाण रस्त्यावर आल्याने दुर्गंधीचा सामनाही करावा लागत आहे. मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने तालुक्यातील तीन-चार गावातील शेती खरडून गेली. सुमारे ५० हेक्टर जमिनीत पाणी शिरले. बोरगडी येथे एका शेतातील केळीचे मोठे नुकसान झाले. दीड तासाच्या कालावधीत अतिवृष्टी होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. कालच्या पावसाने तालुक्यात कुठेही प्राणहानी झाली नाही. - डॉ.संजय गरकल, तहसीलदार दिग्रसच्या धावंडाचा पूल पाण्याखाली दिग्रस शहरासह तालुक्यात मंगळवारच्या रात्री ९ वाजता मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने धावंडा नदीला पूर आल्याने आर्णी मार्गावरील पूल रात्रभर पाण्याखाली होता. तसेच तालुक्यातील अनेक शेतशिवारात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात जवळपास सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यातील सेवानगर, रुई येथील नाल्याला आलेल्या पुरात सुरेश राठोड, नारायण भट्टड, झिपरा डांगरे, चापला नाईक, पार्वतीबाई राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. यामुळे दोन दिवसांपूर्वी पेरलेले बियाणे खरडून गेले. इसापूरलगतच्या नाल्याला आलेल्या पुरात निरज चिंतावार, मंदा चिंतावार यांची पेरणी खरडून गेली. पावसामुळे मोरणा नाला तुडूंब भरून वाहत होता, तर शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या धावंडा नदीला महापुराचे स्वरूप आले होते. नदीतीरावरील घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले.