शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार शेतकऱ्यांना मिळाली सहा कोटी रुपयांची व्याजमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

बँकेला वर्षभरात झालेल्या एकूण नफ्यापैकी काही ठराविक रक्कम ओटीएस योजनेसाठी राखीव ठेवली जाते. या रकमेतून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. सहा वर्षाच्या आत कर्ज भरता न आलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यासाठी शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमध्ये अर्ज दाखल करायचा असतो. यात सहा वर्षापर्यंत एकूण व्याजाच्या ५० टक्के व्याजमाफी दिली जाते. उर्वरित मुद्दल आणि ५० टक्के व्याज शेतकऱ्यांना भरायचे असते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ओटीएस योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत दीड हजार शेतकऱ्यांना सहा कोटी १५ लाख रुपयांची व्याज सवलत मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत ही व्याज सवलत आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे खातेधारक अडचणीतून बाहेर पडतील. बँकेला वर्षभरात झालेल्या एकूण नफ्यापैकी काही ठराविक रक्कम ओटीएस योजनेसाठी राखीव ठेवली जाते. या रकमेतून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. सहा वर्षाच्या आत कर्ज भरता न आलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यासाठी शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमध्ये अर्ज दाखल करायचा असतो. यात सहा वर्षापर्यंत एकूण व्याजाच्या ५० टक्के व्याजमाफी दिली जाते. उर्वरित मुद्दल आणि ५० टक्के व्याज शेतकऱ्यांना भरायचे असते. याशिवाय सहा वर्षापेक्षा जास्त काळापासून कर्ज थकलेले असेल तर या योजनेत मुद्दल आणि व्याज रकमेतून २५ टक्के रक्कम कपात करून उर्वरित सर्व रक्कम ठराविक काळात भरली तर शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. ओटीएस योजनेमध्ये एकाच वेळेस काही रक्कम माफ होते, उर्वरित रक्कम भरल्यानंतर शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरतो. यामुळे ओटीएस योजना प्रत्येक शेतकऱ्यासाठी नवसंजीवनी देणारी आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे. तरच त्याचा लाभ दिला जातो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४३१ शेतकऱ्यांना ओटीएस योजनेचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांकडे २७ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज होते. ते ओटीएस योजनेला पात्र ठरल्याने त्यांना सहा कोटी १५ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. यामुळे हे शेतकरी उर्वरित कर्ज रक्कम भरुन नील झाले आहे. आता पुढील हंगामामध्ये असे शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरणार आहे. यातून पुढील खरिपाचा हंगाम करताना कर्ज वितरणाच्या प्रक्रियेत बँक त्यांना सामावून घेणार आहे.  याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कर्ज खाते सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न आहे. 

 जुन्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. ही कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर त्यात अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटी दुरुस्त करता करता सरकार बदलले आणि विद्यमान सरकारच्या कार्यकाळात जुन्या सरकारमधील कर्जमाफीवर आर्थिक तरतूद झालीच नाही. परिणामी कर्जमाफीला पात्र असलेले जिल्ह्यातील हजारो शेतकरी अजूनही थकीत आहे. त्यांना ना जुनी ना नवी अशी कुठलीच कर्जमाफी मिळाली नाही.

जिल्ह्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमधून लाभ मिळाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा अपघात विमाही बँकेने काढला आहे. पूर्वी ही विम्याची रक्कम एक लाख होती. यावर्षी विमा सुरक्षा कवच दोन लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पुढे ही रक्कम तीन लाखापर्यंत नेण्याचा मानस आहे. - टिकाराम कोंगरेअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ 

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज