शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

महिलांचे दीड लाख राेखपालाने लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

महालक्ष्मी बचत गटाच्या खाते क्रमांकमध्ये ६ नाेव्हेंबर २०२१ रोजी ११ हजार ५०० रुपये आणि २ नाेव्हेंबरला  ४८  हजार रुपये जमा केले. त्याची त्यांनी राेखपालाकडून रितसर  पावती घेतली आहे.  त्याचप्रमाणे अनिता संतोष शिवरकर यांचे खाते क्रमांकमध्ये १५ नाेव्हेंबरला २९ हजार रुपये जमा केले.  सुरेखा गजानन मुल्लेमवार यांनीही ६  ऑगस्ट २०२१ ला बचत खात्यात ४९ हजार रुपये  जमा केले. त्यावेळी या महिलांना राेखपालाने पैसे जमा केल्याची पावती दिली.  मात्र, रोखपालाने महिलांच्या खात्यात पैसे भरलेच नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  बॅंकेतील व्यवहार हा विश्वासावर चालताे. प्रत्येकच बॅंकेतील राेखपालाकडे पैसे देऊन त्याची पाेचपावती घेतली जाते. मात्र, याच विश्वासाला रुंझा येथील विदर्भ काेकण ग्रामीण बॅंकेच्या राेखपालाने तडा दिला. त्याने चार बचत गटांच्या महिलांकडून राेख रक्कम घेतली. त्यांना पाेचपावती दिली. मात्र, रक्कम खात्यात जमाच केली नाही. त्यामुळे बॅंक पैसे देण्यास तयार नाही. पेरणीचा हंगाम ताेंडावर असल्याने हक्काचे पैसे मिळत नाहीत म्हणून या महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या केळापूर तालुक्यातील रुंझा शाखेत महालक्ष्मी बचत गटाच्या अनिता संतोष शिवरकर, सुरेखा गजानन मुल्लेमवार यांचे खाते आहे.  महालक्ष्मी बचत गटाच्या खाते क्रमांकमध्ये ६ नाेव्हेंबर २०२१ रोजी ११ हजार ५०० रुपये आणि २ नाेव्हेंबरला  ४८  हजार रुपये जमा केले. त्याची त्यांनी राेखपालाकडून रितसर  पावती घेतली आहे.  त्याचप्रमाणे अनिता संतोष शिवरकर यांचे खाते क्रमांकमध्ये १५ नाेव्हेंबरला २९ हजार रुपये जमा केले.  सुरेखा गजानन मुल्लेमवार यांनीही ६  ऑगस्ट २०२१ ला बचत खात्यात ४९ हजार रुपये  जमा केले. त्यावेळी या महिलांना राेखपालाने पैसे जमा केल्याची पावती दिली.  मात्र, रोखपालाने महिलांच्या खात्यात पैसे भरलेच नाहीत. याविषयीचे निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती निमीष मानकर उपस्थित हाेते.

आठ महिन्यांपासून चौकशीच सुरू - हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॅंकेने राेखपालाची चाैकशी सुरू केली आहे. आता याला जवळपास आठ महिने पूर्ण हाेत आले आहेत. मात्र, बॅंकेने पैसे भरणाऱ्या महिलांना एकही रुपया परत केलेला नाही. बॅंकेच्या शाखेत जाऊन नियमाप्रमाणे पैसे भरल्यानंतर बॅंकेने आमचे पैसे वेळेत परत करावेत, अशी  मागणी या महिलांनी केली आहे. 

पैशाअभावी शेती पडिक ठेवण्याची वेळ - बचत गटाचा हा व्यवहार असून, हे पैसे शेतातील बी-बियाणे, खते खरेदीकरिता ठेवले हाेते. आता बॅंक पैसे देत नसल्याने शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँक व्यवस्थापकांना याविषयी अर्ज दिला. मात्र, त्या अर्जावर अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली नसल्याचेही या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीfraudधोकेबाजी