शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शनच म्हातारपणाची काठी; एनपीएस तर भूलभुलैया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:00 IST

नोव्हेंबर २००५ पासून शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना आणली. त्यातही आता राष्ट्रीय निवृत्त वेतन (एनपीएस) योजना लागू करण्यात आली. मात्र या योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम शासन विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवित आहे. शेअर बाजार बेभरवशाचा असल्याने या कपातीच्या आधारावर नेमकी किती पेन्शन मिळणार हे निश्चित नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ३०-३५ वर्ष इमाने इतबारे नोकरी केल्यानंतर म्हातारपणाचा आधार म्हणून कर्मचारी निवृत्ती वेतनाकडे डोळे लावून बसलेले असतात. मात्र शासनाने आता कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवरच घाला घातला आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो कर्मचारी मुंबईत पोहोचले आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर पेन्शन मार्च काढला जाणार आहे. त्यासाठी पदयात्रा सुरू असून गुरुवारी ही यात्रा मुलुंडमध्ये दाखल झाली. नोव्हेंबर २००५ पासून शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना आणली. त्यातही आता राष्ट्रीय निवृत्त वेतन (एनपीएस) योजना लागू करण्यात आली. मात्र या योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम शासन विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवित आहे. शेअर बाजार बेभरवशाचा असल्याने या कपातीच्या आधारावर नेमकी किती पेन्शन मिळणार हे निश्चित नाही. कर्मचाऱ्यांना पगारातून होणाऱ्या कपातीचीही ठोस माहिती दिली जात नाही. त्यामुळे असंतोष पसरला आहे. एनपीएस बंद करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी, यासाठी राज्यव्यापी पेन्शन संघर्ष यात्राही काढली गेली. आता मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनावर वितेश खांडेकर, झावरे पाटील, मिलिंद सोळंकी, मधुकर काठोळे, नदीम पटेल आदींच्या नेतृत्वात  पेन्शन मार्च काढला जाणार आहे. शिक्षक समन्वय महासंघाचे पदाधिकारी गुरुवारी रवाना झाले. 

जुनी पेन्शन योजना काय आहे?    

- नोव्हेंबर २००५ पर्यंत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होती. - या योजनेतून फॅमिली पेन्शनचे चांगले सुरक्षा कवच कर्मचाऱ्यांना मिळत होते. 

एनपीएस नव्हे, हा तर सट्टा ! 

पेन्शनची कोणतीही हमी नाही, असे एनपीएसच्या पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले आहे. शेअर बाजार कोसळला, त्या महिन्यात आमची कपात अचानक तिप्पट केली जाते. त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी आम्ही अधिवेशनावर पेन्शन मार्च काढला आहे. - मिलिंद सोळंके 

एनपीएसमध्ये पेन्शन म्हणून अतिशय तुटपुंजी रक्कम मिळणार आहे. जुन्या योजनेतील कुटुंब निवृत्ती वेतनाची यात हमी नाही. संपूर्ण सेवा केल्यानंतर निवृत्तीचे सर्व लाभ आवश्यक आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी असा भेद करण्यात आला.     - गजानन पाटील 

२००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांचे काय?- २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम शेअर बाजारात गुंतविली जात आहे. - शेअर बाजाराच्या चढउतारानुसार दर महिन्यात कपातीची रक्कम कमी जास्त होते. त्यामुळे कर्मचारी बेजार आहे. 

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन