हिवरी : घराच्या पायरीवर बसून असलेल्या एका वृद्धाला ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. बाबाराव माधव राणे (७५) रा. अर्जुना असे मृताचे नाव आहे. ते अॅड.मिलिंद दामले यांचे दिवाणजी होते. नेहमीप्रमाणे अॅड.दामले यांच्या घराच्या पायरीवर ते सायंकाळी बसून होते. त्याचवेळी एका ट्रॅक्टरने चार फूट उंच पायरीला धडक दिली. त्यावेळी पायरीवर बसून असलेले बाबाराव ट्रॅक्टरखाली चिरडल्या गेले. हा प्रकार दिसताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत बाबारावला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.धडक देणारा ट्रॅक्टर निकेश सवाई श्याम यांच्या मालकीचा असून तो त्यांनी आठवडाभरापूर्वीच विकत आणला होता. आपल्या घराजवळ ट्रॅक्टर लावताना निकेशचे नियंत्रण गेले आणि ट्रॅक्टर अॅड.दामले यांच्या घराच्या पायरीवर धडकला. बाबारावच्या मागे पत्नी, तीन मुले आहे. (वार्ताहर)
पायरीवर बसलेल्या वृद्धाला ट्रॅक्टरने चिरडले
By admin | Updated: October 10, 2015 01:53 IST