शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:13 IST

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाºयांचा गुणगौरव आणि विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रिजतर्फे मोफत पुस्तके वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख होते.

ठळक मुद्देकौतुकाची थाप : विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजतर्फे महसूल दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाºयांचा गुणगौरव आणि विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रिजतर्फे मोफत पुस्तके वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख होते.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी अनुप खांदे, संदीप महाजन, विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजचे प्रमुख महेंद्र दर्डा आदी उपस्थित होते.अध्यक्षीय मार्गदर्शनात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनात महत्वाचा अंग मानला जातो. असे असले तरी, इतर विभागाचासुध्दा प्रशासनात महत्वाचा सहभाग आहे. सर्व विभागाच्या समन्वयातूनच चांगले काम होऊ शकते. आपल्याकडे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांशी आपण सौहार्दाने वागलो तर त्याला मिळणारा आनंद त्याच्या मनात चिरकाल टिकतो. त्यामुळे प्रशासनाबद्दल नागरिकांच्या मनात जिव्हाळा निर्माण होईल, या पध्दतीने काम करणे गरजेचे आहे.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी चंद्रकात जाजू, तहसीलदार सचिन शेजाळ, महेंद्र दर्डा यांनीही विचार मांडले. तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजच्यावतीने अंकिता प्रधान, प्रिया करताडे आदी विद्यार्र्थ्याना स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने पाणी फाऊंडेशमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रामाजी टेकाम, तलाठी संतोष चव्हाण, कृषी सहायक शंकर गिरगावकर, ग्रामविकास दूत आश्विनी बांबल, पोलीस पाटील विकास बोरकर यांचा, जलयुक्त शिवारमध्ये कार्य करणारे कृषी अधिकारी ए.आर. पिंपरखेडे, मागेल त्याला शेततळेमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे कृषी सहायक सुभाष राठोड, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत विकासगंगा सामाजिक संस्था तसेच महसूल विभागांतर्गत डिजीटायझेशनमध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया सोनल झोड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, कोतवाल एस.एस. मुंजाळ, पोलीस पाटील पी.बी. कांबळे आदींचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, नितीन हिंगोले यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले. संचालन व आभार नंदकुमार बुटे यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, संदीप अपार, नितीन हिंगोले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbha Chamber of Commerceविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सcollectorजिल्हाधिकारी