शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अळ्यांचा प्रकोप; शेतात सोडली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:15 IST

नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकºयांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतावर नांगर फिरविला आहे.

ठळक मुद्देवेचणीलाही परवडेना कापूस : ४० हजार रुपयांचा खर्च ठरला व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/चिकणी (जामणी) : नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकऱ्यांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतावर नांगर फिरविला आहे. जामणी येथील शेतकऱ्यानेही वेचणीलाही कापूस परवडत नसल्याने शेतात गुरे सोडलीत.जिल्ह्यात कपाशी पिकावर गुलाबी तथा बोंडअळीने हल्ला केला आहे. यामुळे संपूर्ण बोंडेच किडली आहेत. यात फुटलेला कापूस वेचण्यासही शेतमजूर तयार नसल्याने शेतकऱ्यांना कापूस न वेचताच उलंगवाडी करावी लागत आहे. वर्धा तथा देवळी तालुक्यातील चिकणी, जामणी, पडेगाव, निमगाव तसेच परिसरातील कपाशी पिकांवर बोंड अळीचा प्रकोप दिसून येत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाला तोंड देत अहोरात्र श्रम करून कपाशी पीक जपले; पण बोंडअळीच्या प्रकोपामुळे हातचे पीक गेले आहे. बोंडअळीचा फटका देवळी तालुक्यातील जामणी येथील युवा शेतकरी अतुल राऊत याला बसला. अतुलने २८ मे रोजी प्री मान्सून बिटी कपाशीची दोन एकरात लागवड केली. यावर याने ४० हजार रुपये खर्च केला. कपाशीचे पीक चांगले बहरले. चांगले उत्पन्न होईल, अशी आशा होती. बोंड भरत असताना बोंडअळीचा हल्ला झाला. यात कपाशीची बोंडे किडली. कापूसही किडक निघत आहे. यंदा केवळ दोन क्विंटल कापूस निघाला. याच शेतात मागील वर्षी ३२ क्विंटल कापूस झाला होता. मजूरही कापूस वेचण्यास तयार नाही. यामुळे नाईलाज म्हणून पिकातच गुरे सोडावी लागली. यात खर्चही व्यर्थ गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.स्वत: शेताची पाहणी केली. बोंडअळीच्या हल्ल्यामुळे बोंडे किडली असल्याने कापूस निघणार नाही. अर्ज भरण्यास सांगितले आहे. शासनाकडून किती मदत होईल, हे सांगणे कठीण नाही. शेतकऱ्यांना बीटी कपाशीची लागवड करताना काही अंतरावर नॉन बिटी लावावी. यामुळे बीटी कपाशीच्या बोंडावर हल्ला झाला नसता.- व्ही.एस. खैरकार, कृषी सहायक, मंडळ सोनेगाव (आ.).अळ्यांमुळे भीतीचे वातावरणहिंगणी - गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त आहे. येथील युवा शेतकरी स्रेहल पोकळे यांच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. कष्टाने जपलेल्या पिकांवर महागडी फवारणी केली; पण कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची सर्रास विक्री केली जाते. यामुळे शेतकरी फसतात. बोंडअळी, पाने कातरणारी अळी, लाल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी भरपाईची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :cottonकापूस