शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:03 IST

इतर मागासवर्गावर (ओबीसी) होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवित ओबीसी आरक्षण बचाव समितीने सोमवारी भरपावसात जिल्हा कचेरीवर धडक दिली. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. स्थानिक तिरंगा चौकात पावसातच सभा घेण्यात आली.

ठळक मुद्देसरकारविरोधात घोषणा : वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेत ओबीसी आरक्षण पूर्ववत करा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इतर मागासवर्गावर (ओबीसी) होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवित ओबीसी आरक्षण बचाव समितीने सोमवारी भरपावसात जिल्हा कचेरीवर धडक दिली. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. स्थानिक तिरंगा चौकात पावसातच सभा घेण्यात आली.एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेत ओबीसीचे २७ टक्के आरक्षण रद्द करून दोन टक्क्यावर आणले आहे. यामुळे ओबीसींच्या गुणवंत विद्यार्थ्यांना यंदा प्रवेशाची संधी मिळाली नाही. ओबीसींना प्रगतीपासून रोखण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. स्वातंत्र्यापासून ओबीसीची जातनिहाय जनगणनाच झाली नाही. त्यामुळे ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसींना लावलेली असंवैधानिक क्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी आणि शेतकरी, शेतमजुरांना पेंशन देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.स्थानिक महात्मा फुले चौकातून निघालेला हा मोर्चा शहरातील विविध भागाने मार्गक्रमण करीत तिरंगा चौकात पोहोचला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चाचे नेतृत्व प्रदीप वादाफळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, डॉ.दिलीप घावडे, डॉ. दिलीप महाले, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, उत्तम गुल्हाने, नानाभाऊ गाडबैले, अरुण राऊत, दिनेश गोगरकर, डॉ.ज्ञानेश्वर गोरे, लक्ष्मीकांत लोळगे, राजू देशमुख, दीपक वाघ, संजय लडके, विठ्ठल नागतोडे, प्रकाश फेंडर, राजू देशमुख, अमन निर्बान, रमेश गिरोलकर, जितेंद्र हिंगासपुरे यांनी केले. या मोर्चात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.भरपावसात मोर्चाभरपावसात निघालेल्या या मोर्चाने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चेकरी छत्र्या घेऊन आणि रेनकोट घालून या मोर्चात सहभागी झाले होते. भरपावसातही घोषणांनी परिसर दणाणला होता. पावसाची तमा न बाळगता या मोर्चात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.