शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

दहा नगरांमध्ये डासांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:59 IST

डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने यवतमाळ शहरात कीटक सर्वेक्षण केले असता दहा नगर-कॉलण्यांमध्ये डासांचे प्रमाण (घनता) सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देहिवताप विभागाचा अहवाल : कीटक सर्वेक्षण, डेंग्यूचे संकट कायम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने यवतमाळ शहरात कीटक सर्वेक्षण केले असता दहा नगर-कॉलण्यांमध्ये डासांचे प्रमाण (घनता) सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे.सर्वाधिक डास असलेल्या क्षेत्रामध्ये बांगरनगर, शिरभाते ले-आऊट, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, अग्रवाल ले-आऊट, चिंतामणी ले-आऊट, आदर्शनगर, विठ्ठलवाडी, डोर्लीपुरा, वंजारीफैल आदी नगरांचा समावेश आहे. येथील डासांची घनता ही पाच ते सात पेक्षाही (१५ मिनिटात आढळणारे डास) अधिक आहे. यामुळेच शहरात दिवसागणिक डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे.सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडताच डेंग्यूची सुरूवात झाली. डेंग्यूचा डांस हा स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने शहरातील स्वच्छ व साफसफाई असलेल्या परिसरामध्ये या डांसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. हिवताप विभागाकडून डांसाची घनता मोजण्यासाठी एकक वापरले जाते. साधारणत: १५ मिनिटाच्या कालावधीत किती डास सापडतात यावरून ही घनता मोजली जाते. तीन पेक्षा अधिकची घनता ही धोकादायक समजली जाते. प्रत्यक्षात डेंग्यूच्या एडीसएजीप्ट या डांसाची घनता ही पाच ते सातच्यावर आढळून आली. स्थिती धोकादायक असल्याचा अहवाल हिवताप विभागाने दिला. हिवताप विभागाचे शहरात १० कीटक सर्व्हेक्षक आहेत. त्याच्याच अहवालातून हे धक्कादाय वास्तव पुढे आले आहे. मान्सूनपूर्व कार्यक्रमांतर्गत हिवताप विभागाने पाच हजारांवर रक्त नमुने गोळा केले आहे. खासगी रुग्णालयांमधून १२०० वर रक्त नमुने तपासण्यात आले आहे. यातील ४६ नमुने पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. अनेक ठिकाणी खासगीत केवळ पेशींच्या संख्येत घट आल्यामुळे थेट डेंग्यूचा उपचार केला जात आहे. यावर नियंत्रणाची गरज आहे.आरोग्य विभागाची शहरात संयुक्त मोहीमडेंग्यूचा प्रकोप थांबविण्यासाठी नगपरिषद आरोग्य विभागाने आता संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये एमपीडब्ल्यू, एएनएम, आशा स्वयंसेविका आणि सफाई कामगार यांचे पथक तयार केले आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र पथक कार्यरत असून घरोघरी जावून जनजागृती करणार आहे. याशिवाय केमीफॉस अ‍ॅक्टीव्हीटी राबविणार आहे. आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस म्हणून सक्तीने पाळला जाणार आहे. वाढीव क्षेत्रातील अनेक खुल्या प्लॉटमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहेत. येथेही मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. यावर नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करण्याची सूचना केली आहे.