शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
2
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
3
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
4
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
6
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
7
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
8
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
9
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
10
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
11
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा
12
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
13
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
14
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
15
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
16
Tripti Sahu : "TV स्टार्स गोरं होण्यासाठी घेतात इंजेक्शन", पंचायत फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
17
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
18
Astro Tips: चमचाभर तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, मंगळवारी पिंपळाच्या पारावर ठेवायला हवा; कारण...
19
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
20
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश

‘जेडीआयईटी’मध्ये आज ‘एनटीपीसी १६’

By admin | Updated: July 29, 2016 02:21 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परमाणु व दूरसंचार विभाग तसेच आयईटीई यवतमाळ सबसेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परमाणु व दूरसंचार विभाग तसेच आयईटीई यवतमाळ सबसेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल टेक्नीकल पेपर कान्टेस्ट २०१६ (एनटीपीसी-१६) चे आयोजन २९ जुलै रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवर आयोजित या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यातून सुमारे ४० महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी एकूण १३७ शोधनिबंध नोंदवून उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. सहभागी चमूंच्या शोधनिबंधांचे मूल्यांकन राज्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे ५० तज्ज्ञ परिक्षकांचे हस्ते करण्यात आले. या मूल्यांकनाद्वारे सादरीकरणाकरिता निवडलेल्या सर्वोत्कृष्ट प्रथम पाच शोधनिबंधांमध्ये नवी दिल्ली अलाहबाद, कोलकाता व महाराष्ट्रातील शोधनिबंधांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांचे सादरीकरण महाविद्यालयामध्ये होणार असून यातील सर्वोत्कृष्ट तीन शोधनिबंधांना आयईटीई नवी दिल्ली येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ‘एटीसी २०१६’ या सोहळ्यामध्ये रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी ‘जेडीईएस’ संस्थेचे सचिव किशोर दर्डा, आयईटीई नवी दिल्लीचे झोनल कोआॅर्डिनेटर (पश्चिम विभाग) डॉ. जे.डब्ल्यू. बाकल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. जी.आर. बामनोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. कोल्हटकर, आयईटीई अमरावती केंद्राचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. इंगोले, आयईटीई यवतमाळ उपकेंद्राचे अध्यक्ष डॉ. एस. एम. गुल्हाने, आयईटीई अमरावती केंद्राचे सचिव प्रा. ए. बी. देशमुख, आयईटीई यवतमाळ उपकेंद्राचे सचिव प्रा. पी. एम. पंडित, तसेच आयईटीईचे विविध पदाधिकारी, सदस्य, विशेष निमंत्रित व तज्ज्ञ परिक्षक उपस्थित राहणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)