शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता निळोणा जलाशयातच घेतला जातो पाण्याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:11 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून मुबलक पाण्याचे पॉर्इंट शोधण्यास भूजल सर्वेक्षण विभागाने निळोणा जलाशयाच्या पात्रातच मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देविहिरीचीही चाचपणी : भूजल सर्वेक्षण विभागाने निवडले पाच पॉर्इंट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून मुबलक पाण्याचे पॉर्इंट शोधण्यास भूजल सर्वेक्षण विभागाने निळोणा जलाशयाच्या पात्रातच मोहीम हाती घेतली आहे. तशा पाच पॉइंटचा निळोणा क्षेत्रात शोध घेण्यात आला आहे. यामध्ये निळोणा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या विहिरीचा शोध लागला आहे.निळोणा जलाशयाचे क्षेत्र क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे सपाट झाले. हे क्षेत्र टोळगोटे आणि फॅक्चर रॉकने व्यापले आहे. अशा ठिकाणी पाण्याचा सोर्स असतो. पाणी ताशी १० हजार लिटर प्रवाह बाहेर सोडेल, अशा मुबलक जलसाठ्याचा शोध भूजल सर्वेक्षण विभागाने सुरू केला आहे. धरणाच्या क्षेत्रात त्यासाठी पाच पॉर्इंट निवडले आहे.यामध्ये एक मुबलक पाण्याची विहीर आहे. त्यातून पाणी हाताने काढता येते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे. या विहिरीला स्वच्छ करून त्यावरून पाणी भरता येईल, काय याचा विचार करण्यात येत आहे. इतर पॉइंटवर ताशी १० हजार लिटर पाणी बाहेर पडल्यास टँकर भरणे सोपे होणार आहे. शहराच्या दृष्टीने हे अंतर सर्वात कमी राहणार आहे.सीओंकडून पाहणीशहरातील पाण्याचे स्त्रोत अपुरे पडत आहे. यामुळे मुबलक पाण्याच्या विहिरींचा शोध घेण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी दिले होते. मुख्याधिकारी अनिल अडागळे यांनी त्या दृष्टीने शनिवारी दिवसभर जलस्त्रोतांची पाहणी केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई