शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

आता जिल्हा परिषदेत युतीच्या सत्तेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 22:16 IST

साडेचार वर्षे सत्तेत राहून टोकाचा विरोध केल्यानंतरही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेने एकत्र येत युती केली. युतीचा हाच पॅटर्न आता सत्तेसाठी येथे जिल्हा परिषदेत राबविला जाणार का? याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

ठळक मुद्देभाजपा-शिवसेना : काँग्रेसला सत्तेबाहेर करण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : साडेचार वर्षे सत्तेत राहून टोकाचा विरोध केल्यानंतरही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेने एकत्र येत युती केली. युतीचा हाच पॅटर्न आता सत्तेसाठी येथे जिल्हा परिषदेत राबविला जाणार का? याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेस-भाजपा व राष्ट्रवादीची सत्ता आहे. वास्तविक सर्वाधिक २० जागा शिवसेनेने जिंकल्या. मात्र सेनेला बाहेर ठेवण्यासाठी भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची खेळी खेळली. यामागे भाजपा व सेना नेतृत्वातील वर्चस्वाची लढाई असल्याचे सांगितले जाते. सत्तेची संधी असताना शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागल्याने सेनेचे सदस्य आता जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस-भाजपा व राष्ट्रवादीला सळो की पळो करून सोडतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात अभ्यासाच्या अभावामुळे सभागृहात हे चित्र कधीही पहायला मिळाले नाही. थातूरमातूर विरोधाच्या पुढे सेनेने काही केल्याचे ऐकिवात नाही. जिल्हा परिषदेतील काँग्रेस व मित्र पक्षांच्या सत्तेची अडीच वर्षे पूर्ण होत आहे. नेत्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत अडीच वर्षांपूर्वी झालेली चूक किमान आता तरी भाजपा-सेनेचे नेतृत्व सुधारणा का? याकडे नजरा आहेत.राज्यात व केंद्रात शिवसेना सत्तेत आहेत. त्यानंतरही सेनेने भाजपाला संधी मिळेल तेव्हा टोकाचा विरोध केला. परंतु ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनुष्यबाण भात्यात टाकून भाजपाशी युती केली. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाची बोलणीही आत्ताच पूर्ण केली. ठरल्याप्रमाणे युतीची गरजही विषद केली. राज्यात आगामी निवडणुकीसाठी युती झालीच आहे तर तोच कित्ता यवतमाळ जिल्हा परिषदेत गिरविला जाणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसे झाल्यास भाजपा-सेनेच्या तुलनेत अर्ध्या जागा असूनही गेली सव्वादोन वर्ष सत्तेचा ‘लाभ’ घेणाऱ्या काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागू शकते.अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने नव्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतीपदासाठी लवकरच निवडणूक होईल. त्यावेळी भाजपा-सेना नेतृत्वाकडून जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकविण्याचा निर्णय होऊ शकतो. मात्र निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी युतीची केवळ ‘खानापूर्ती’ केल्यास जिल्हा परिषदेत सत्तेच्या नव्या समीकरणाचाही वेगळा निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हा परिषदेत भाजपासोबत असलेला काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष बाहेर याच पक्षावर कडाडून टीका करतो. काँग्रेसने तर पक्ष नेतृत्वाने आदेश देऊनही जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडण्याची तसदी घेतली नाही. यावरून पक्षापेक्षा खुर्चीची लालसा अधिक असल्याचे स्पष्ट होते. जिल्हा परिषदेत भाजपा-सेनेनेच सत्तेत रहावे, काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसवावे, अशी अनेक सदस्य तसेच पक्ष कार्यकर्त्यांची भावना असली तरी नेतृत्व वेगळ्याच वाटेवर चालत असल्याने या निष्ठावंत कार्यकर्त्यांची चांगलीच राजकीय कोंडी होते. पक्षासाठी जनतेत जाऊन काम करताना व त्यांना सत्तेच्या या विचित्र समीकरणाचे स्पष्टीकरण देताना नाकीनऊ येतात. अशावेळी नाईलाजाने ‘तो नेत्यांचा निर्णय’ असे म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवावे लागते असाच बहुतांश कार्यकर्त्यांचा अनुभव आहे.आर्णीतही बदलवावा लागणार ‘पॅटर्न’सत्तेसाठी वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येण्याचा हा प्रकार केवळ जिल्हा परिषदेत नाही. आर्णी नगरपरिषद व पंचायत समितीमध्येसुद्धा काँग्रेसने भाजपा आणि सेनेशी घरठाव केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेचा पॅटर्न बदलल्यास आर्णीतील त्या दोन संस्थांमध्येही तो बदलला जाण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद