शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

शाळांमध्ये आता मान्यवरांचे स्वागत होईल पुस्तक देऊन

By admin | Updated: October 17, 2015 00:31 IST

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील शाळांमध्ये मान्यवरांच्या भेटीप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्याऐवजी पुस्तक देऊन ...

शिक्षण विभागाचा निर्णय : शासनाच्या आदेशावर वेगवेगळे मतप्रवाहयवतमाळ : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील शाळांमध्ये मान्यवरांच्या भेटीप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्याऐवजी पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करावे, असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी काढले. पुस्तक भेट देण्यामागे वाचनसंस्कृती वाढीस लागावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी, अशा प्रकारचा हेतू यातून शासनाचा दिसून येतो. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणारी कार्यालये, अकृषी विद्यापिठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये अशा ठिकाणी नियमितपणे मान्यवर व्यक्ती, अधिकारी आणि इतर सबंधित कामकाजाच्या निमित्ताने येत असतात. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि अधिकारी यांचे सर्वसाधारणपणे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या अनुषंगाने त्यांचा १५ आॅक्टोंबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीसुद्धा शाळा-महाविद्यालयांसह इतर अनेक कार्यालयांमध्ये गुरुवारी पहिला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर एकूणच वाचन संस्कृती व वाचन प्रेरणा वाढीस लागावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणारे कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था येथे येणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या भेटी किंवा समारंभाप्रसंगी त्यांचे स्वागत पु्ष्पगुच्छ देऊन करण्याऐवजी विविध विषयांवरील पुस्तके देऊन करण्यात येणार आहे. शासनाच्या या आदेशाबाबत शैक्षणिक वर्तुळातच वेगवेगळे मत व्यक्त होत आहे. अनेकजणांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे तर अनेकांनी यावर वेगळे मत व्यक्त केले आहे. केवळ पुस्तक भेट देऊन शासनाचा वाचन संस्कृतीस हातभार लावण्याचा हेतू साध्य होईल का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. शिवाय पुस्तक भेट देण्यासाठी आर्थिक तदतुदही करावी लागणार आहे. पुष्प भेट देण्यासाठी फारशी आर्थिक तरतूद करावी लागत नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोफत फुले उपलब्ध होतात. शिवाय मान्यवरांना दिलेले पुस्तक त्यांच्याकडून वाचले जाईलच, याची खात्री कोण देणार. अनेकजण केवळ कपाटात ठेवण्यासाठी पुस्तके घेऊन जातात. नंतर मात्र ती पुस्तके धूळ खात पडतात. त्यांचा कोणालाही उपयोग होत नाही. भेट देण्यात आलेल्या पुस्तकांचे वाचन होणे गरजेचे आहे. तरच या निर्णयाचा हेतू साध्य होऊ शकेल. शाळा-महाविद्यालयांनी आलेल्या पाहुण्यांना पुस्तके भेट देण्यापेक्षा आलेल्या पाहुण्यांनीच जर शाळेसाठी एखादे चांगले पुस्तक भेट दिले तर ते अधिक परिणामकारक ठरू शकेल. कारण यामुळे संबंधित शाळेचे वाचनालय अधिक प्रगल्भ आणि समु्रद्ध होईल. अशा शाळेतील परिपूर्ण प्रगल्भ वाचनालयातील पुस्तकांचा फायदा त्या शाळेत सद्यस्थितीत आणि भविष्यात शिकणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना आपोआप मिळेल आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा किंबहुना ती वाढविण्याचा शासनाचा हेतू यशस्वी होईल, यात कोणतीही शंका नसल्याचा एक मतप्रवाह दिसून येतो. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता शासनाच्या या निर्णयापूर्वीच यवतमाळ जिल्ह्यात शाळांमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत पुस्तके व वृक्ष देऊन करण्यात येत आहे, तसे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेशच असल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाल्या. तसेच शासनाच्या या निर्णयाने आणखी जोमाने वाचन संस्कृती राबविण्यास मदत होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शासनाचा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. परंतु यामध्ये केवळ पाहुण्यांनी शाळेकडून पुस्तक न घेता शाळेसाठीही नवनवीन वेगवेगळी पुस्तके घेऊन जावीत, असे माझे व्यक्तिगत मत आहे. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनासाठी फारसे साहित्य उपलब्ध नसते, या माध्यमातून ते त्यांना मिळेल आणि ग्रामीण शाळांमधील वाचनालये समृद्ध बनतील, अशी प्रतिक्रिया माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. वाचन संस्कृतीला समृद्ध करण्याच्या उद्देशाने शासनाने हा उपक्रम सुरू केला असून, तो यशस्वी करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)