शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता धान्य वितरण आॅनलाईन

By admin | Updated: April 18, 2017 00:06 IST

स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांत पॉस मशीन बसविण्याचा निर्णय घेतला.

पॉसचा अंगठा : २०५० दुकानांत अंमलबजावणी, सहा लाखांवर कार्डधारकयवतमाळ : स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांत पॉस मशीन बसविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता स्वस्त धान्याचे वितरण आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. मे महिन्यापासून या आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील सहा लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले जाणार आहे.यवतमाळ जिल्हा आदिवासीबहुल आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांतून मोठ्या प्रमाणात धान्याची उचल केली जाते. आता शेतकऱ्यांनाही स्वस्त धान्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात अन्नपूर्णा आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाही स्वस्त धान्य वितरित केले जाते. जिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांची एकूण संख्या तब्बल सहा लाख ३६ हजारांच्या घरात पोहोचली आहे. यातील पाच लाख ३५ हजार कुटुंबांचे राशन कार्ड आता आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहे. सहा लाख ३६ हजार शिधापत्रिकाधारकांच्या राशन कार्डवर चार ते १० सदस्यांची नोंद आहे. आत्तार्यंत कुणीही या कार्डवर धान्याची उचल करीत होते. मात्र आता शिधापत्रिकेत नाव असलेले कुटुंब प्रमुख अथवा नाव असलेल्या इतर सदस्यांच धान्य खरेदी करता येणार आहे. त्याकरिताच ही पॉस मशीन बसविण्यात येणार आहे. या मशीनवर धान्य खरेदी करणाऱ्याला अंगठा लावणे बंधनकारक आहे. त्यांनी अंगठा लावताच त्यावर आधार कार्डचा नंबर येणार आहे. त्यानंतरच धान्य वितरित केले जाणार आहे. या मशिनमध्ये स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आणि किती धान्य कोटा आला, ग्राहकांची संख्या किती आणि उचल किती झाली, याची संपूर्ण माहिती समाविष्ट राहणार आहे. महिन्याचे वाटप संपल्यानंतर नवीन धान्य घेण्यापूर्वी ही मशीन तालुक्यातील पॉस केंद्राला कनेक्ट करावी लागणार आहे. त्यानंतरच दुसऱ्या महिन्याचे धान्य दुकानदाराला उचलता येणार आहे.या मशीनमध्ये अद्ययावत माहिती समाविष्ट राहणार असल्याने धान्य शिल्लक राहिल्याचा अलर्ट मशिनने दिल्यास तितके धान्य पुढीलवेळी कमी मिळणार आहे. गर्व्हमेंट रिसिप्ट अकाउंट सिस्टिमद्वारे दुकानदाराला धान्याच्या खरेदीचे चालान फाडावे लागणार आहे.(शहर वार्ताहर)जिल्हा मुख्यालयातून नियंत्रणया संपूर्ण आॅनलाईन प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात १६ पॉस केंद्र उघडण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील दुकानदारांना संबंधित तालुक्यातील केंद्रावर या मशीनचा डाटा फिड करावा लागणार आहे. ही संपूर्ण प्रकिया जिल्हा मुख्यालयातून नियंत्रित होणार आहे. यामुळे दुकानदारांनी शिल्लक धान्य न दाखविल्यास मशिनच तशी सूचना केंद्राला देणार आहे. यामुळे स्वस्त धान्यातील धान्य चोरी आणि काळाबाजाराला लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.