शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शेतामध्ये बोअरवेलसाठी आता मिळवा ५० हजारांपर्यंत अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 18:24 IST

एसटी लाभार्थी : शेतकऱ्यांना महाडिबीटी पोर्टलवर करावा लागणार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर विहिर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळ्यासाठी मल्चिंग, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाइप, जुनी विहीर दुरुस्त करता येते. त्यासाठी ५० हजार रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

शेतीची सिंचन क्षमता वाढावी म्हणून शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहे. यामुळे पिकांसाठी सिंचनाची व्यवस्था करता येते. गत पाच वर्षात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन विहिरीची योजना राबविली जात आहे. यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून ही योजना मिळविता येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. यामुळे कोरडवाहू क्षेत्रदेखील ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.

अर्ज कसा कराल?महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी योजना नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे लागणार आहे. नंतर तुम्हाला बिरसामंडा कृषी क्रांती योजनेचा पर्याय दिसेल त्याला ओपन करावे लागणार आहे. त्यानंतर त्यावर विचारलेली माहिती अपलोड करून अर्ज सबमिट करावा लागणार आहे.

चार लाखांचे अनुदानबिरसा मुंडा योजनेमध्ये अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना चार लाखांचे अनुदान दिले जाते. पूर्वी या योजनेवर अडीच लाखांचे अनुदान होते.

कशासाठी किती अनुदानयोजना                            अनुदान (रुपये)नवीन विहिर                         ४,००,०००जुनी विहिर दुरुस्ती                 १,००,०००इनवेल बोअरिंग                     ४०,०००नवीन बोअर                          ५०,०००वीजजोडणी                           २०,०००शेततळे अस्तरीकरण              २,००,०००सूक्ष्म सिंचन                           ९७,०००परसबाग                                ५,०००पीव्हीसी पाइप                        ५०,०००पंप संच                                 ४०,०००सोलरपंप जोडणी                    ५०,०००यंत्र सामग्री                             ५०,०००

आवश्यक कागदपत्रे

  • बोअरवेलच्या लाभासाठी अर्जदाराकडे आधारकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, सातबारा, आठ 'अ', दारिद्र्यरेषेचे कार्ड, अर्जदाराचे १०० रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र, विहिरीसाठी पाणी उपलब्धतेचा दाखला, शेतात विहीर नसल्याचा दाखला आवश्यक आहे.
  • ५०० फूट अंतरावर कुठलीही विहीर नसल्याचा दाखला, कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रिय पाहणी शिफारसपत्र, संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र, जागेचा फोटो, ग्रामसभेचा ठराव, या कागदपत्रांची आवश्यकता आहे. मंजुरी नंतर कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

काय आहे योजनेचे निकष?अर्जदार हा महाराष्ट्राची रहिवासी असावा. अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. पात्र अर्जदाराकडे स्वतःच्या जातीचा दाखला असावा. अर्जदाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे लागणार आहे. जमिनीचा सातबारा आणि आठ 'अ' हे त्याच्याच नावाचे असावे लागणार आहे. लाभार्थ्यांकडे किमान ४० आर जमीन असणे गरजेचे आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळgovernment schemeसरकारी योजना